आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवाहाच्या एक दिवस आधी गर्लफ्रेंडसोबत नवरदेव रफुचक्कर; नवरीने दिले असे उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा- लगीनघरी शहनाईच्या निनादात सगळे उत्साहात होते. नववधुच्या हातावर मेंदी सजली होती. उद्या वरात येणार, या विचाराने नवरी आनंदाने भारवली होती. पण, विवाहाच्या एक दिवस आधी कारची डि‍मांड पूर्ण न झाल्याने नवरा मुलगा बेपत्ता झाल्याचे वृत्त लगीनघरी धडकले. पण, नवरदेव गर्लफ्रेंडसोबत पळून गेल्याचा दावा, नववधुच्या काकांनी केला आहे.

वाचा, काय आहे हे प्रकरण?
एएसपी अनुराग वत्‍स यांनी सांगितले की, नववधुच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून नवरदेव आणि त्याच्या वडिलांविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

गर्लफ्रेंडसोबत नवरदेव फरार झाल्यानंतर नवरीने दिले हे उत्तर...
- मोनिका असे नवरीचे नाव आहे. ती म्हणाली, 'अशा लोभी लोकांचा खरा चेहरा वेळेआधीच समाजासमोर आला. एक दिवसही उशीर झाला असता तर माझे आयुष्य उद्‍धवस्त झाले असते.'
- नवरीच्या वडिलांनी सांगितले की, आम्ही विवाहाची संपूर्ण तयारी केली होती. नवरदेव पळून गेल्याने समाजात आमची बदनामी झाली आहे. अशा लोकांना कठोर शिक्षा मिळायला हवी.
नवरी मुलगी स्वत:चे काही बरेवाईट करणार नाही, याची भीती..
- मोहिनीच्या काकूने सांगितले, नवरीला या घटनेचा मोठा मानसिक धक्का बसला आहे. रडून रडून तिने स्वत:चे हाल केले आहेत. ती काही बरेबाईट तर करणार नाही, याची सगळ्यांना भीती वाटत आहे.
- पाहुणे घरी पोहोचले होते. मॅरिज हॉल ऐवजी सगळ्यांना घरीच जेवू घालावे लागत असल्याचे नवरीच्या काकांनी सांगितले.
- लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.

विवाह ठरल्यानंतर मागितला हुंडा...
- आग्रा येथील गणेश नगरात राहाणार्‍या मोनिकाचा राजपूर चुंगी येथील पिंटूसोबत विवाह ठरला होता.
- 24 नोव्हेंबरला दयाल बागमधील गोपाल वाटिकेत पिंटूची वरात येणार होती.
- नवरदेवाला हुंड्याच्या रुपात 8 लाख रुपये देण्याचे ठरले होते. नवरीच्या वडीलांनी याची पूर्ण तयारी केली होती.
- पण, 23 नोव्हेंबरला अचानक नवरदेवाच्या नातेवाईकांचा फोन आला आणि ते कारची मागणी करू लागले. अन्यथा नवरदेव विवाह करणार नसल्याची त्यांनी धमकी दिली.

कुटुंबातील प्रत्येकाने तासंतास रांगेत उभे राहून बदलून घेतल्या नोटा...
- मोहिनीच्या वडिलांनी सांगितले की, नोटबंदीच्या निर्णयाने आम्हाला मोठ्या समस्येचा सामना करावा लागला. कुटुंबातील प्रत्येकाने बँकेबाहेेर तासंतास रांगेत उभे राहून नोटा बदलून घेतल्या.
- स्टेट बॅंकेबाहेर पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खाव्या लागल्या. तेव्हा कुठे विवाहाची तयारी पूर्ण झाली.
- काका प्रमोद यांनी सांगितले की, 21 नोव्हेंबरला लग्न टीका घेऊन आम्ही नवरदेवाच्या घरी केले होते. तेव्हा अपाचे गाडी आणि एक लाख रोख दिले होते. त्यात 50 हजार रुपयांच्या नव्या तर 50 हजाराच्या जुन्या नोटांचा समावेश होता. तेव्हा मात्र त्यांनी कारची डिमांड केली नाही.
- टीव्ही, फ्रिज, वाशिंग मशीन आणि फर्निचर आधीच नवरदेवाच्या घरी पोहोचवण्यात आले होते.

दुसर्‍या तरुणीसोबत होते नवरदेवाचे संबंध...
- मोहिनीचे काका प्रमोद यांनी सांगितले की, पिंटूचे एका मुलीसोबत संबंध होते. ती त्याच्या ऑफिसात काम करत होती.
- 22 नोव्हेंबरला या मुलींने पिंटूच्या घरी जाऊन प्रचंड गदारोळ केला होता. त्यानंतर पिंटू तिच्यासोबत रफुचक्कर झाला.
- पिंटू पळून गेल्यानंतर त्याच्या वडिलांनी तो बेबत्ता असल्याची तक्रार ताजगंज पोलिस ठाण्यात नोंदवली होती.

पुढील स्लाइडवर पाहा, नवरी मुगली आणि लगीनघराचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...