आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानी नवरीसाठी आला विदेशी नवरदेव, पाकिस्तानात पाहिले गेले लाइव्‍ह लग्‍न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमा. - Divya Marathi
सलमा.
बुंदी (राजस्‍थान) - येथील सलमा आणि पाकिस्‍तानातील कराची येथील दानिश यांचे गुरुवारी रात्री 9 वाजता लग्‍न झाले. लग्‍न होताच दोन्‍ही कुटुंबांनी एकमेकांचे अभिनंदन केले. मौलाना गुलामे गौस यांनी या विवाहाचे धार्मिक विधी पार पाडले. दानिश याचे पाकिस्‍तानातील अनेक नातेवाईक इच्‍छा असूनही या विवाहात भाग घेऊ शकले नाहीत. त्‍यामुळे ते लॅपटॉपच्‍या मदतीने ऑनलाइन या लग्‍नाचे साक्षीदार झाले.

दोन्‍ही कुटुंबाचे नाते जुने
वर आणि वधूच्‍या कुटुंबाचे नाते जुने आहे. यापैकी वर दानीश याचे आजोबा फाळणीच्‍या वेळी पाकिस्‍तानात गेले होते. पण, आपल्‍या भारतातील नातेवाईकांसोबत त्‍यांना संबंध तोडायचे नव्‍हते. त्‍यामुळे दोन्‍ही कुटुंबात 'बेटी' व्‍यवहार व्‍हावा, अशी त्‍यांची इच्‍छा होती. त्‍यातूनच हे लग्‍न झाले. 15 नाव्‍हेंबर नवरदेव दानिशची वरात भारतात आली. या ठिकाणी त्‍याचे नातेवाईक बह्मपुरी येथील मामा नुरूद्दीन अॅडव्‍होकेट यांच्‍या घरी थांबले. वधूकडच्‍यांनी आतीशबाजी आणि पुष्‍पहारांनी त्‍यांचे स्‍वागत केले. राजस्‍थानच्‍या रस्‍त्‍यावरून पाकिस्‍तानच्‍या नवरदेवाची वरात निघाली.
पुढील स्लाइड्सवर पाहा नवरा-नवरीचे फोटोज...