आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरीला घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टरने आला नवरदेव, अख्ख्या गावावर केली रोषणाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर - लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण. तो अविस्मरणीय ठरला पाहिजे यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरीने प्रयत्न करतो. जगभरात कोणी हवेत तर कोणी समुद्राच्या तळाशी जाऊन लग्न लावले आहे. सर्वसाधारणपणे नवरदेव घोडीवर येतो मात्र, उदयपूर मधील पलानाकाला गावात एक वर चक्क हेलिकॉप्टर घेऊन नवरीला घेण्यासाठी आला.
वरपक्षाच्या मंडळींच्या स्वागतासाठी अख्ख्या गावावर रोषणाई करण्यात आली होती. गावातील मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली गेली. गावात हेलिकॉप्टर येण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी त्यामुळे संपूर्ण गाव हेलिकॉप्टर पाहाण्यासाठी धावले. अनेकांनी नवरदेव मोहित आणि हेलिकॉप्टरसोबत फोटो काढून घेतले. स्वतःचा फोटो काढून झाल्यानंतर आपल्या मुलाबाळांसह गावकऱ्यांनी हेलिकॉप्टरसोबत फोटो काढून घेण्याची हौस पूर्ण केली.
वधू किरण सुंयलचे नागरमगरा येथील मोहित सोबत धुमधडाक्यात लग्न लागले.

पुढील स्लाइडवर पाहा PHOTOS...