आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

23ला झाले लग्न 25ला नवरी ट्रेनमधून पळून गेली, एका लग्नाची गोष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- शनिवारी खंडवा रेल्वेस्टेशनवर फिल्मी ड्रामा पहायला मिळाला, खराबी झाल्यामुळे येथे पाटलिपुत्र-लोकमान्य टिळक एक्सप्रेस थांबली आणि नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी नवरीला शोधू लागली. ट्रेनच्या एसी कोचमधून नवरी अचानक गायब झाली होती. खिंडवा जंक्शनवर नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानतर नवरीच्या शोधात नवरदेव थेट इटारसी येथे पोहोचला आणि तेथे ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. नवरदेवाने सांगितले की, 23 तारखेला त्यांचे लग्न झाले होते, त्यानंतर वऱ्हाडीमंडळीसह ते परत येत होते. 25 तारखेला सकाळी नवरी गायब झाली. पोलिस आणि नातेवाईक नवरीचा शोध घेत आहेत.

पाटलीपूत्रहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनकच्या एसी कोचमध्ये नवरदेव छत्रपति शर्मा वऱ्हाडी मंडळी आणि आपली नवरी प्रीति शर्मासह प्रवास करत होता. त्यांना मुंबईच्या कल्याण जंक्शला पोहोचायचे होते. रात्री नवरदेव-नवरी आणि सर्व वऱ्हाडी मंडळी झोपी गेले. 
- सकाळी सर्व जण जागी झाले तेव्हा नवरी आपल्या सीटवर नव्हती. वऱ्हाडी मंडळींनी संर्व ट्रेनमध्ये शोधले, परंतु ती सापडली नाही. एका यात्रेकरूने सांगितले की, त्याने नवरीला इटारसी स्टेशनजवळ उतरताना पाहिले होते.
- खंडवा जंक्शनवर नवरीला शोधण्याल्यानंतर नवरदेव आणि त्याचे मित्र इटारसी येथे पोहोचले. तेथे रेल्वे पोलिसांना माहिती देऊन आसपासच्या परिसरात नवरीचा शोध घेतला, परंतु कुठेही ती सापडली नाही.


23 ला लग्न 25 ला नवरी बेपत्ता..
- छत्रपतिने सांगितले की, त्याचे लग्न 23 नोव्हेंबरला सिंगरौरी येथे झाले. 24 नोव्हेंबरच्या रात्री तो नवरी आणि वऱ्हाडींना घेऊन जबलपूरवरून मुंबईला येणासाठी रवाना झाला. 25 ला सकाळी प्रीति आपल्या सीटवर नव्हती, कळत नाहीये नेमकी कुठे गेली.
- नवरीचे वडिल जायराम शर्मा यांनी सांगितले की, रात्री मुलीचा फोन आला होता, तिच्यासोबत बोलणे झाले होते. शनिवारी सकाळी तिच्याविषयी कळाल्यापासून चिंते आहोत. मुलीचा शोध घेत आहोत. तिच्याकडे मोबाईलही नाहीये.


पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...