आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुजुर्ग म्हणाले : दगड फेकणाऱ्यांना रोखले तर ते आम्हाला थापड मारतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सव्वा महिन्यापासूनच्या संचारबंदीचा परिणाम केवळ श्रीनगरच नाही तर जवळपासच्या भागात जाणवत आहे. रस्ते सुनसान आहेत. चौकात जिकडे-तिकडे दगड आणि जळालेल्या वाहनांचे अवशेष लढाई सुरू असल्याची जाणीव करून देतात. गल्लीतील खिडक्यांचे तुटलेल्या काचातून भीती डोकावते. चार भींतीआड सामान्य नागरिक चिडलेले, घाबरलेले आणि रागावलेले आहेत आणि रस्त्यावर पोलिस, सीआरपीएफचे जवान. दगडफेकीत गंभीर जखमी होऊनही ते दररोज १८ ते २० तास ड्युटी करत आहेत. श्रीनगरमधील तणावपूर्ण स्थितीचा आढावा घेतला उपमिता वाजपेयी यांनी. वाचा पूर्ण ग्राउंड रिपोर्ट...
श्रीनगर : काश्मिरात संचारबंदीला ३९ दिवस झाले आहेत. ६५ जण मारले गेले आहेत. एक दिवसही संचारबंदीत शिथिलता नाही. कदाचित देशातील ही सर्वात मोठी संचारबंदी असावी. २०१० मध्येही हिंसाचार चार महिने चालला. तेव्हा अधूनमधून संचारबंदी शिथिल होत होती. मात्र या वेळी...? याच कारणांचा शोध घेण्यासाठी दहशतवाद्यांचा बालेकिल्ला डाऊन टाऊनमध्ये १२ तास घालवले. परिसरात दोन प्रकारचे चेहरे दिसले. एक- असहाय व भयभीत आणि दुसरे संतापललेले. आम्ही युवा, महिला व बुजुर्गांशी चर्चा केली.

डाऊन टाऊनचा महाराजगंज काश्मीरचा सर्वात मोठा बाजार. बंद दुकानाबाहेर बसलेले बुजुर्ग सांगतात, ९० च्या दशकापासून संचारबंदी येथील जीवनाचा भाग आहे. संचारबंदी व धरपकड आधीही होत होती. दगडफेक झाली नाही असा एकही शुक्रवार पाहिला नाही. मात्र या मुलांना एवढे बेफाम पाहिले नव्हते. दगडफेक्यांना का समजावत नाही? असे विचारता ६५ वर्षींय बुजुर्ग म्हणाले,‘आम्ही त्यांना रोखले तर ते आम्हालाच थापड मारतात. ते दुसऱ्या मोहल्ल्यातून येथे येऊन जवानांवर दगड फेकतात. आम्ही त्यांना ओळखतही नाही. ते तोंड बांधून धुडगूस घालतात. मशिदीतून लोकांना मोर्चात येण्यासाठी, अर्ध्या रात्री दार ठोठावून रस्त्यावर येऊन घोषणाबाजी करा म्हणून धमकावतात.’ तेथे बसलेल्या आणखी काही बुजुर्गांनी होकार देत आमची मुले अशी नाहीतच, अशी हमी दिली. दगडफेक येथील पेशाच बनला आहे.

काश्मीर खोऱ्यात जिथून दहशतवाद सुरू झाला तो हाच डाऊन टाऊन भाग. त्याला श्रीनगरचा गाझाही म्हटले जाते. दाटीवाटीच्या लोकसंख्येच्या या ५० वर्ग किमीच्या भागात ६ पोलिस ठाणी आहेत. सर्वाधिक दगडफेके येथेच आहेत.बुलेटप्रूफ गाड्यांची वाट रोखण्यासाठी रस्त्यावर भले मोठे दगड पडलेले आहेत. अनेक ठिकाणी ‘बुरहान आबाद... पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा लिहिल्या आहेत. मीरवाइज उमर फारूखच्या बंद कार्यालयाबाहेरच्या चौकात पाकिस्तानचा झेंडाही फडकत आहे.

पुढील स्लाईड्सवर वाचा : नंदनवनात कशी आहे परिस्थिती, कर्फ्यू आणि हिंसेचा बाजार, जनता आणि सैन्यांवर कसा पडत आहे प्रभाव तसेच निवडक फोटोंमधून पाहा काय सांगत आहे परिस्थिती...
बातम्या आणखी आहेत...