आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशेच्या विळख्यात तरुण; पोलिसांपासून नेत्यांपर्यंत तस्करांशी साटेलोटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड | अमृतसर| जालंधर - आपली पत्नी आणि मुलगीही अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे ऐकून चंदिगडचा रहिवासी तरनजित (बदललेले नाव) याच्या पायाखालची जमीनच त्या दिवशी सरकली. तरनजित दीर्घकाळापासून या व्यवसायात सहभागी होता. त्याच्या पत्नी आणि मुलीने याची कधी चव चाखली आणि त्या जाळ्यात कधी ओढल्या गेल्या याचा थांगपत्ताही त्याला लागला नाही. दोघी लपूनछपून अमली पदार्थांचे सेवन करत होत्या. पंजाबमधील अमली पदार्थ व्यवसायाचे हे वानगीदाखल एक उदाहरण. पंजाब गेल्या अनेक वर्षांपासून अमली पदार्थांचे केंद्रबिंदू झाला आहे. अफू, भुक्कीपासून सुरू झालेले हे प्रकार हेरॉइन, स्मॅक, कोकेन, सिंथेटिक ड्रग, आइस ड्रग यासारख्या महागड्या नशेत रूपांतरित झाले आहे.
नशाखोरीमुळे अनेक संसार, घरे उद्ध्वस्त झाली. व्यसनाधीनतेमुळे अनेक तरुणांचा अकाली मृत्यू झाला. नपुंसकतेमुळे अनेकांची घरे मोडली. अमली पदार्थ तस्करीमागचे मुख्य कारण पाकिस्तान आहे. पाकिस्तानलगतच्या तरनतारण,अमृतसर, फिरोजपूर, फाजिल्कामध्ये सर्वाधिक अमली पदार्थांच्या व्यसनाची प्रकरणे समोर येत आहेत. याशिवाय बठिंडा, मानसा, संगरूर आणि मुक्तसरमध्येही असेच चित्र आहे. अफगाणिस्तानातून पाकिस्तान आणि त्यानंतर पंजाबमधून कॅनडा, अमेरिकेपर्यंतच्या तस्करीत सहभागी राजकीय नेत्यांची नावेही समोर आली आहेत.

यामध्ये सर्वाधिक चर्चेत आलेले नाव म्हणजे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांचे मेहुणे व कॅबिनेट मंत्री विक्रम मजिठिया यांचे आहे. २०१३ मध्ये सहा हजार कोटींच्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर अटक करण्यात आलेला एशियाड स्पर्धेतील माजी खेळाडू आणि अर्जुन पुरस्कार विजेता जगदीश भोलाने कॅबिनेट मंत्री मजिठिया यांच्यावर गंभीर आरोप केले. मुलगा दमनवीर सिंह याच्यावर तस्करीचा आरोप झाल्यानंतर तुरुंग विभागाचे माजी मंत्री सरवनसिंह फिल्लौर यांना राजीनामा देणे भाग पडले होते. याशिवाय भाजप नेते अविनाशचंद्र आणि काँग्रेस नेते राजा वडिंग यांच्यावरही आरोप झाले आहेत.

पंजाबचे पोलिस महानिरीक्षक परमराजसिंह उमरानंगल यांच्यावरही आरोप होत आहेत. अनेक मंत्री, आमदारांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशी केली आहे. दोन वर्षांपासून ही चौकशी सुरू आहे, मात्र अद्याप ते निष्कर्षाप्रत पोहोचले नाहीत. ईडीचे एक सहायक संचालक निरंजनसिंह यंानी नि:पक्ष चौकशीस सुरुवात केली तेव्हा त्यांची बदली करण्यात आली. प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर सरकारने बदलीस स्थगिती दिली. २०१३ पासून आतापर्यंत दीड लाख तरुणांनी व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतले आहेत. यामध्ये दोन टक्के मुलींचा समावेश असून त्या १५ ते २६ वर्षे वयोगटातील आहेत. पंजाबचे पोलिस महासंचालक सुरेश अरोरा म्हणाले, इथे अमली पदार्थांची तस्करी आणि त्याच्या पुरवठ्याचा विषय गंभीर आहे. आम्ही व्यसनाधीनतेविरुद्ध मोहीम चालवत आहोत. यासाठी अमली पदार्थ नियंत्रण विभाग स्थापन केला आहे. या व्यवसायातील तस्करांबरोबरच ग्राहकांवरही कारवाई केली जात आहे. तस्करांची मालमत्ता जप्त केली जात आहे. राज्यात जिल्हास्तरावर पथके स्थापन करण्यात अाली आहेत. पंजाबमध्ये एवढी व्यसनाधीनता वाढली आहे की, पोलिस भरतीमध्येही मादक पदार्थांची चाचणी(डोप टेस्ट) ठेवावी लागत आहे.

सुरुवातीस भरती वेळी डोप टेस्ट नव्हती. पंजाबमध्ये आतापर्यंत सर्वाधिक अमली पदार्थ सीमा क्षेत्रात पकडण्यात आले होते. अमली पदार्थ नियंत्रक विभागाचे संचालक ईश्वरसिंह म्हणाले, व्यसनाधीनता वेगाने वाढत आहे. एनडीपीएस अधिनियमांतर्गत तस्करांविरुद्ध मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होत आहेत. यात शिक्षा भाेगून आलेले गुन्हेगार पुन्हा व्यवसायात ओढले जाऊ नये यासाठी त्यांना ताब्यात घेतले जात आहे.
आकडे बोलतात
* ८.६ लाख लोक पंजाबमध्ये मादक पदार्थांची नशा करतात
*२.३ लाख लोकांना ड्रग्जचे गंभीर व्यसन आहे.
*८९% सुशिक्षित तरुण व्यसनाच्या विळख्यात
*६००० कोटींपेक्षा जास्त ड्रग्ज ५ वर्षांत जप्त
पुढे वाचा...
पंजाबमधील तीन मातब्बर नेत्यांच्या गावातील स्थिती
बातम्या आणखी आहेत...