आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगी मुख्यमंत्री झाल्यानंतर रास्वसंघाचे इनकमिंग वाढले, मोदींच्या तुलनेत 4 पटीने वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगी मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वयंसेवक होण्यासाठी विक्रमी अर्ज दाखल झाले. - Divya Marathi
योगी मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वयंसेवक होण्यासाठी विक्रमी अर्ज दाखल झाले.
लखनऊ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) सदस्य संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. 11 मार्च रोजी विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात संघात दाखल होण्यासाठी हजारो ऑनलाइन अर्ज आले होते. 16 ते 31 मार्च दरम्यान 22 हजार 432 अर्ज आले. 15 दिवसांमध्ये आलेले हे विक्रमी अर्ज होते. एकट्या उत्तर प्रदेशमधून 8 हजार 919 अर्ज तर दिल्लीतून 1680 अर्ज आले होते. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन केल्यानंतर गेल्या तीन वर्षात संघात दर महिन्याला 7 हजार अर्ज येत होते. यूपीमध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर हा आकडा 31 हकाजर 637 पर्यंत पोहचला. 2014 मधील लोकसभा विजयानंतरच्या तुलनेत अर्ज करणाऱ्यांची संख्या चार पटीने वाढली आहे. 
 
एप्रिलमध्ये आले 9 हजार अर्ज 
- 'द इंडियन एक्स्प्रेस'च्या रिपोर्टनुसार, 1 ते 15 एप्रिल दरम्यान 9 हजार 205 ऑनलाइन अर्ज आले, त्यातील 2 हजार 788 एकट्या उत्तर प्रदेशमधून आले होते. 
- संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वाधिक चमकदार कामगिरी आहे. हे आकडे फक्त ऑनलाइन अर्जांचे आहेत. प्रत्यक्ष किंवा स्वयंसेवकांच्या माध्यमातून संघात दाखल झालेल्यांची संख्या तर अजूनच अभिमानास्पद आहे. 
- मोदी पंतप्रधान झाल्यानंतर संघात दाखल होण्याचा लोकांचा ओढा वाढला होता. गेल्या तीन वर्षात दर महिन्याला स्वयंसेवक होण्यासाठी साधारण 7 हजार अर्ज येत होते. योगी मुख्यमंत्री झाल्यानंतर हा आकडा कित्येक पटीने वाढून 31 हजार 637 वर पोहोचला आहे. 
- यावर्षी 1 जानेवारी ते 31 मार्च पर्यंत 41 हजार 134 अर्ज संघाकडे आले आहेत. 
 
पश्चिम बंगालमध्ये वाढत आहे संघ 
- यावर्षी संघाने पश्चिम बंगालवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. येथे संघाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 1 जानेवारी ते 15 एप्रिल दरम्यान 3 हजार 422  अर्ज आले आहे.
- संघ प्रत्येक राज्याची आपल्या पद्धतीने विभागणी करते. त्यांनी पश्चिम बंगालला दोन भागात वाटून घेतले आहे. एक उत्तर तर दुसरा भाग पश्चिम आहे. 
 
सत्तेत येताच वाढले स्वयंसेवक होण्यासाठी अर्ज 
- 2014 मध्ये देशात सत्तांतर झाल्यानंतर संघाचा स्वयंसेवक होण्यासाठी अर्जांची संख्या अचानक वाढली. 2013 मध्ये जिथे संघाकडे 28 हजार 424 अर्ज आले होते लागलीच पुढच्या वर्षी अर्जांची संख्या 97 हजार 339 वर जाऊन पोहोचली. 
- त्यानंतर 2015 मध्ये 81 हजार 620, 2016 मध्ये 84 हजार 941 आणि यावर्षी 15 एप्रिलपर्यंत 50 हजार 339 अर्ज आले आहे.

संघाची लोकप्रियता वाढू लागली 
- एका नेत्याने सांगितले, की केरळ, पूर्वोत्तर आणि बंगालसारख्या राज्यांमध्ये संघाची लोकप्रियता वाढत आहे. यावरुन आमचे काम आणि विचारांवर लोकांचा विश्वास वाढत चालला आहे. 
- सध्या देशात संघाच्या 57 हजार 233 शाखा आहे. 
बातम्या आणखी आहेत...