आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रद्युम्नचा एक घाव 18 सेमी लांब - 2 सेमी रुंद, पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनाही बसला धक्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळेचा बस कंडक्टरने प्रद्युम्नचा खून केला होता. त्याच्या गळ्यावर दोन वार होते. - Divya Marathi
शाळेचा बस कंडक्टरने प्रद्युम्नचा खून केला होता. त्याच्या गळ्यावर दोन वार होते.
गुडगाव - रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये मर्डर झालेल्या 7 वर्षांच्या प्रद्युम्नचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. त्यात मृत्यूचे कारण आघात (Shock) आणि रक्त वाहून गेले (Hemorrhage) असे सांगण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार प्रद्युम्नवर धारदार शस्त्राने दोन वार करण्यात आले होते. त्याच्या गळ्यावर एक घाव 18 सेंमी लांब आणि 2 सेमी रुंद होता. गेल्या आठवड्यात शुक्रवारी (8 सप्टेंबर) गुडगावमधील भोंडसी येथील रेयान स्कूलच्या टॉयलेटमध्ये प्रद्युम्नचा मृतदेह सापडला होता. 
 
डॉक्टरांनाही बसला धक्का
- पोस्टमॉर्टम करणारे डॉ. माथूर म्हणाले, प्रद्युम्नवर दोन वार करण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या शरीरावर एक 18 सेंमी लांब आणि 2 सेमी रुंद घाव झाला होता. त्याच्याच 2 सेमी खाली दुसरा घाव करण्यात आला होता. तो 12 सेमी लांब आणि 2 सेमी रुंद होता. 
- डॉ. माथूर हे 17 वर्षांपासून पोस्टमॉर्टम करत आहेत. प्रद्युम्नच्या मृत्यूवर त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले मुलाला क्रूरपणे मारण्यात आले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मर्डर 3 ते 4 मिनिटात घडवून आणण्यात आला. 
- एएनआयच्या रिपोर्टनुसार, मुलाचा खून एका बाजूने धार असलेल्या शस्त्राने करण्यात आली आहे.
 
सीबीआय चौकशीची घोषणा 
- प्रद्युम्न हत्येचा तपास सीबीआयकडे देणाची घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शुक्रवारी केली. 
- पोलिसांच्या तपासाबाबत शंका असेल तर तपास सीबीआयकडे का सोपवला जात नाही, अशी विचारणा पंतप्रधान कार्यालयाने केल्यानंतर खट्टर यांनी लागलीच ही घोषणा केली. 
- मुलाच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
 
काय आहे प्रकरण
- गुडगाव येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये 8 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वर्षांच्या मुलाचा शाळेच्या टॉयलेटमध्ये मृतदेह सापडला होता. हत्याच्या आरोपात शुक्रवारी सायंकाळीच शाळेचा बस कंडक्टर अशोक कुमारला अटक करण्यात आली होती. आरोपी अशोक 8 महिन्यांपूर्वीच शाळेत कामाला लागला होता. 
- अशोकने माध्यमांना सांगितले की माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी टॉयलेटमध्ये चुकीचे काम करत होतो. ते मुलाने पाहिले आणि मग मी त्याला धक्का दिला. नंतर आत ओढले. तर तो ओरडाओरड करायला लागला. त्यामुळे घाबरून मी चाकूने त्याचा गळा चिरला. 
 
बातम्या आणखी आहेत...