आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबीसी नेता अल्पेश याचा काँग्रेसमध्ये सोमवारी प्रवेश; काँग्रेसचा 125 जागांवर विजयाचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- गुजरातेतील इतर मागासवर्गीय समाजातील प्रमुख नेत्यांपैकी एक अल्पेश ठाकोर यांनी  काँग्रेस पक्षात सोमवारी प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची सायंकाळी भेट घेतल्यानंतर त्यांनी पक्षप्रवेशाची घोषणा केली. गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्या प्रचारफेऱ्यांमध्ये ते व त्यांचे समर्थक सहभागी होतील, असेही अल्पेश यांनी जाहीर केले.  पाटीदार समाजाचा  नेता हार्दिक पटेल व दलित नेता जिग्नेश मेवाणीही लवकरच काँग्रेस पक्षात सहभागी होणार असल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. तर हार्दिक पटेल याने काँग्रेस पक्षाने आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी अट घातली आहे. तर जिग्नेश मेवाणी यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ, असे सांगितले.

  मात्र, हार्दिक पटेल म्हणाला, मला निवडणूक लढवायची नाही. कायदेशीरदृष्ट्या निवडणूक लढवण्यास मी पात्र नाही. आम्ही अहंकाराच्या विरोधात निवडणूक लढवत आहोत. ही केवळ काँग्रेस पक्षासाठीची निवडणूक नसून ६ कोटी जनतेची निवडणूक आहे. विजय आम्हालाच मिळणार आहे, असा दावा त्याने केला. हार्दिकचे वय २४ वर्षे असून निवडणूक लढवण्यासाठी २५ वर्षे वयाची अट आहे. 

गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भरतसिंह साेळंकी यांनी शनिवारी म्हटले, पक्ष अल्पेश व मेवाणी यांना निवडणूक लढवण्यासाठी पाठिंबा देईल. जर हार्दिक भविष्यात निवडणूक लढवणार असेल तर त्याला पाठिंबा किंवा उमेदवारी देण्यात येईल.  राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारास साथ देणाऱ्या जदयूचे (शरद यादव गट) आमदार  छोटू वसावा यांच्याकडेही काँग्रेसने मदत मागितली आहे.  या सर्व नेत्यांच्या सहकार्यातून काँग्रेस पक्षाला १८२ पैकी १२५ जागांवर सहज विजय मिळेल, असे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भरत  सोळंकी म्हणाले.  
 
हार्दिक पटेलला धक्का
पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेल यास मोठा धक्का बसला आहे. संघटनेच प्रवक्ता वरुण पटेल व पाटीदार आंदोलनाचा प्रमुख चेहरा रेश्मा पटेल या दोघांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. रेश्माने हार्दिकला काँग्रेस पक्षाचा एजंट असल्याचा आरोप केला आहे.
 
गुजरात भाजप संसदीय बोर्डाची बैठक सुरू  
गुजरात भाजप संसदीय बोर्डाची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारपासून सुरू झाली. यात सर्व १८२ जागांवर संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक जागेसाठी तीन उमेदवारांचा विचार सुरू आहे. पक्षाकडून ही यादी राष्ट्रीय संसदीय बोर्डास पाठवण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...