आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक: काँग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी, स्वस्त घरकुल शक्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- विधानसभा निवडणुकीसाठी भाजप अाणि काँग्रेसने ‘पहले अाप’ करीत उमेदवारी यादी घाेषित केली. अाता जाहीरनामा घाेषित करण्यासाठीदेखील त्याचीच ‘री’ अाेढली जात अाहे. मतदानासाठी माेजके दिवस शिल्लक असताना येत्या २-३ दिवसांत काँग्रेस जाहीरनामा घाेषित करणार असे दिसते. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी, सर्वांसाठी स्वस्त घरकुल यासारख्या बाबींचा समावेश असेल. बहुधा काँग्रेसपाठाेपाठ भाजप जाहीरनामा घाेषित करेल. 


काँग्रेसचा जाहीरनामा तयार करण्यापूर्वी पक्ष कार्यकर्ते अाणि स्वयंसेवी संस्थांशी चर्चा करण्यात अाली हाेती, अशी माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दीपक बाबरिया यांनी दिली. राहुल गांधी यांनी यासाठी सार्वजनिक सुनावणीच्या धर्तीवर प्रत्यक्ष लाेकांना भेटून सॅम पित्राेदा यांच्या मदतीने काम करण्याची सूचना केली हाेती. दुसऱ्यांदा पक्षाने प्रत्येकाचे म्हणणे एेकून घेतले. अाता नव्याने त्याचे संकलन केले जात अाहे. काँग्रेस सरकारचा हा ‘राेड मॅप’ असेल असेही ते म्हणाले. हा जाहीरनामा येत्या ५ किंवा ७ तारखेला जाहीर केला जाण्याची शक्यता पक्ष प्रवक्ते मनीष दाेषी यांनी वर्तवली. ज्या घाेषणा खऱ्या अर्थाने पूर्ण करता येतील त्यांचाच समावेश करण्याचे कडक निर्देश राहुल गांधी यांनी अाम्हाला दिले हाेते. यात लाेकानुनय अजिबात असणार नाही त्यामुळे अनेक बाबी अाम्हाला काढून टाकाव्या लागल्या. त्यामुळे दुसऱ्यांदा काम करावे लागत असून याच कारणामुळे जाहीरनाम्याला विलंब झाला अाहे. 

 

काँग्रेसनंतर भाजपचा जाहीरनामा

या खेपेस काँग्रेसच्या पाठाेपाठ भाजप जाहीरनामा घाेषित करणार अाहे. धाेरणात्मक रणनीतीमुळे जाहीरनाम्यास विलंब हाेत असल्याचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. भाजपचा जाहीरनामा तयार अाहे, मात्र त्यात सुधारणा करून लवकरच प्रकाशित केला जाईल. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, भाजपची रणनीती आणि नरेंद्र मोदीचे २१ मजली उंच बॅनर... 

बातम्या आणखी आहेत...