आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat Election: Attention From Congress On The Demands Of Traders, Businessmen

महाराष्ट्राच्या धर्तीवर गुजरातेत वस्त्राेद्याेग मंत्रालय हवे! व्यापा-यांच्या मागण्यांवर काँग्रेसचे लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- महाराष्ट्राच्या धर्तीवर गुजरातेत स्वतंत्र मंत्रालय हवे, अशी मागणी या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जाेर धरत अाहे. येथील वस्त्राेद्याेग क्षेत्राशी निगडित अनेकांनी या बाबीचा अाग्रह धरला अाहे. तसेच अॅक्युम्युलेटेड इनपुट टॅक्स क्रेडिट रिफंड देणे अाणि जाॅब वर्कवरील जीएसटी शून्य टक्के करण्याची मागणीदेखील वस्त्राेद्याेग क्षेत्रातील उद्याेजकांनी केली. 


दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा तयार करण्यापूर्वी सॅम पित्राेदा, पक्षाचे उपाध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी येथील विणकर, व्यापारी, उद्याेगपती, पेट्राे केमिकल्स असाेसिएशनच्या अध्यक्षांशी चर्चा केली. या निवडणूक जाहिरनाम्यात सर्वसामान्यांच्या हिताचे मुद्दे असतील मात्र व्यवसाय, उद्याेगाशी निगडित मुद्द्यांवर अधिक लक्ष दिलेले असेल असे संकेत यातून मिळतात. 


गुजरातमधील शिक्षणाचे बाजारीकरण, अाशा अाणि अंगणवाडी ताईंच्या वेतनासह अनेक मुद्द्यांविषयी काँग्रेसकडे तक्रारी करण्यात अालेल्या हाेत्या. या पार्श्वभूमीवर सॅम पित्राेदा अाणि मिस्त्री यांनी गुजरातच्या प्रमुख शहरांचा दाैरा सुरू केला. विविध शहरांतील २,५०० स्थानिकांना भेटून त्यांच्या अपेक्षा अाणि समस्या जाणून घेतल्या. एकूणच या सगळ्या बाबींचा साकल्याने विचार करून अाम्ही त्यांना जाहीरनाम्यात स्थान देण्याचा प्रयत्न करू, असे सॅम पित्राेदा यांनी सांगितले. राज्यातील विणकरांना देण्यात यावयाचे काेट्यवधीचे अनुदान राज्य सरकारतर्फे दिले जावे, प्राेफेशनल टॅक्स रद्द करण्यात यावा अाणि विजेचे प्रति युनिट दरदेखील कमी करण्यात यावेत, अशी मागणीदेखील अामच्याकडे करण्यात अाली असल्याचे सॅम पित्राेदा म्हणाले. 

 

सुरतला गारमेंट हब करा
गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तारूढ झाले तर जीएसटीमध्ये सुधारणा करण्यासह सुरतला गारमेंट हब बनवण्यात यावे अाणि ताे संपूर्ण परिसर ५ वर्षे करमुक्त ठेवण्यात यावा. सुरत शहरात वस्त्राेद्याेग मंत्रालयाचे कार्यालय सुरू करण्यात यावे यावरदेखील भर देण्यात अाला अाहे.

बातम्या आणखी आहेत...