आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपची दुसऱ्या फेरीसाठी 13 उमेदवारांची पाचवी यादी केली जाहीर; दोन आमदारांना वगळले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शुक्रवारी दुसऱ्या फेरीसाठी आपल्या १३ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात भाजपने विद्यमान दोन आमदारांना वगळले आहे. गुजरातमधील मध्य व उत्तर भागाचा दुसऱ्या फेरीत समावेश होतो.


निवडणुकीच्या तोंडावर प्रल्हाद पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्टी दिली होती. परंतु त्यांना विजापूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली नाही. मेहसाणा मतदारसंघात भाजपने रमणभाई पटेल यांना उभे केले आहे. गुजराती अभिनेता हितेश कनोदिया, भाजपचे खासदार प्रभात सिंह चौहान यांच्या स्नूषा सुमन प्रविण सिंह चौहान यांची नावे यादीत आहेत.


राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान भाजपच्या बाजूने कौल देणाऱ्या अमित चौधरी यांना या निवडणुकीत विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे. चौधरी यांनी राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसचा राजीनामा दिला होता. भाजपने आता रणछोड राबरी (पाटण), नारायण पटेल (उंझा), वल्लभ काकडिया (ठक्करबापा नगर), पंकज देसाई (नादियाड) या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. पक्षाने लालजीभाई कोली पटेल यांना यादीतून वगळले आहे. आतापर्यंत भाजपने १८२ पैकी १४८ जागांसाठीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

बातम्या आणखी आहेत...