आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आघाडीच्या दाव्यानंतर 4 तासांतच काँग्रेस-हार्दिक यांच्या संघटनेत फूट; सुरतमध्ये तोडफोड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर- काँग्रेस व पाटीदार नेता हार्दिक पटेल यांच्या संघटनेत आघाडी झाल्याचे दावे गुजरातमध्ये दोन्ही बाजूंनी झाले खरे; परंतु नंतर चार तासांतच फूट पडली. सायंकाळी पावणेसात वाजता पाटीदार अनामत आंदोलनाशी (पास) आघाडी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आणि रात्री ११ वाजता ७७ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात हार्दिकचे दोन सहकारी ललित वसोया व अमित पटेल यांचीच नावे होती. ही माहिती मिळताच हार्दिकचे कार्यकर्ते संतापले. काँग्रेसने परस्पर यादी जाहीर केल्याचा आरोप करत काही कार्यकर्त्यांनी सुरतमध्ये काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भरत सोळंकी यांच्या घरासमोर पासचे कार्यकर्ते एकत्र आले.  दरम्यान, काँग्रेस उमेदवारांविरुद्ध अनेक मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याची भाषा पासचे कार्यकर्ते करत होते. यावर हार्दिक किंवा काँग्रेसमधून काहीही प्रतिक्रिया दिली गेली नाही.

 

कशी बदलली परिस्थिती?
संध्याकाळी 6.45 वाजता: काँग्रेस आणि पाटीदार अनामत आंदोलन समितच्या सदस्यांनी समझौता झाल्याचा दावा केला.
रात्री 11.15 वाजता: काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जारी होताच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अनेक शहरांत विरोध सुरू.


पहिल्या यादीत 23 जागांवर पटेल, 12 जागांवर कोळी उमेदवार
- काँग्रेसच्या पहिल्या यादीत 77 उमेदवारांपैकी 23 पटेल समुदायातून आहेत. 12 उमेदवार कोळी, 8 ओबीसी आणि 7 दलित समुदायातून आहेत. 14 जागांवर मागच्या वेळी लढलेल्याच उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

 

पुढील स्लाईडवर फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...