आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हार्दिक पटेलला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा; केंद्रच्या सूचनेवरून साेबत राहतील सीआयएसएफ जवान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर- पाटीदार अांदाेलन समितीचे संयाेजक हार्दिक पटेल यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात अाली अाहे. त्यामुळे अाता केंद्र सरकारच्या सूचनेवरून पटेल यांच्यासाेबत २४ तास सीअायएसएफचे जवान राहतील. तसेच त्यांच्या घराबाहेर पाेलिसांचा बंदाेबस्तदेखील राहणार असून यासाठी पटेल यांनी मंजुरी दिली अाहे.


माझ्या जिवाला धाेका अाहे. त्यामुळे मी ‘वाय’ दर्जाची सुरक्षा स्वीकारावी, असे काही उच्चपदस्थ पाेलिस अधिकारी गेल्या तीन-चार दिवसांपासून मला समजावत असल्याचे हार्दिक पटेल यांनी सांगितले. त्यामुळे मी परवानगी दिली. त्यानुसार एक दल माझ्या घराबाहेर बंदाेबस्तास असेल, तर एक माझ्यासाेबत राहील. २४ नाेव्हेंबरपासून ही सुरक्षा मिळेल. विशेष म्हणजे गुजरातेत दाेन वर्षांपासून अांदाेलन करणारे हार्दिक पटेल यांच्यासह संघटनेच्या अनेक संयाेजकांनाही पाेलिस सुरक्षा देण्याचे सांगण्यात अाले. मात्र, त्यास नकार देण्यात अाला. यातील जिग्नेश मेवाणी व अल्पेश ठाकाेर यांनाही सुरक्षा देण्यात अालीय.

 

 मोदींच्या ३५ सभा, राहुल यांचा आज दौरा

 गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ९ डिसेंबरला मतदान आहे. भाजपकडून पीएम नरेंद्र मोदींसह ५० बडे नेते, सीएम व मंत्री २६ नोव्हेंबरपासून प्रचार करतील. मोदी २७ नोव्हेंबरला ४ सभा घेतील. मोदी राज्यात ३२ ते ३५ सभा घेतील. राहुल गांधी यांची शुक्रवारी सभा आहे.

बातम्या आणखी आहेत...