आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणूक अाखाड्यासाेबतच अाकाशातही माेदी-राहुल लढत; 2 लाख पतंगांची पेच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- या वर्षीच्या मकर संक्रांतीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र माेदी अाणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात अाकाशात घनघाेर युद्ध रंगणार अशी चिन्हे दिसत अाहेत. निरनिराळ्या संकल्पनांवर अाधारित २ लाखांहून अधिक पतंगांची निर्मिती करण्यात अाली अाहे. माेदी विरुद्ध राहुल या संकल्पनेवरील पतंगांना माेठी मागणी अाहे. १० वर्षांपूर्वी गुजरातच्या अाकाशात नरेंद्र माेदी यांचा फाेटाे असलेले पतंग सर्वत्र दिसत हाेते. परंतु या वेळी राहुल गांधींचा फाेटाे असलेल्या पतंगांची मागणी वाढते अाहे. 


पतंग उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार अातापर्यंत चार लाखांहून अधिक पतंग बनवून तयार झाले अाहेत. १५ दिवसांपासून पतंग बाजारात राैनक अाली अाहे. गुजरातच्या पतंग बाजारात सर्वप्रथम राहुल गांधी यांचा फाेटाे असलेला पतंग अाला. अद्याप तरी काेणत्या पक्षाने अॉर्डर दिलेली नाहीत. 

 

पाटीदार फॅक्टरच्या पतंगांना मागणी नाही 
अहमदाबादचे पतंग उत्पादक रसूल रहीम यांच्या मते मागच्या विधानसभा निवडणुकीत पाटीदारांकडून माेठी अाॅर्डर हाेती. परंतु अधिकांश पतंगांची विक्री झाली नाही. या खेपेस निवडणुकीतील पाटीदार फॅक्टरने घेतलेले वळण पाहता निवडणूक वातावरण तापताच या पतंगांची मागणी वाढेल. पाटीदार ब्रँड पतंगांना फारशी मागणी नाही. याशिवाय सुरतच्या कापड बाजारात देशभरात पाठवल्या जाणाऱ्या साड्यांच्या डब्यावरदेखील राजकीय प्रचार सुरू अाहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, काेणत्या प्रकारचे किती पतंग...

 

बातम्या आणखी आहेत...