आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Gujarat Elections; In The First Phase, BJP Congress Has 175 Candidates For 89 Seats

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात निवडणूक; पहिल्या टप्प्यात 89 जागांवर भाजप-काँग्रेसचे 175 उमेदवार, 9 महिला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घोड्यावर स्वार : संगीता पाटील  सुकतच्या लिंबायत जागेवरून भाजपच्या उमेदवार आहेत. मंगळवारी झाशीच्या राणीच्या आवेशात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी घोड्यावर बसून शहरातून फेरी काढली. - Divya Marathi
घोड्यावर स्वार : संगीता पाटील सुकतच्या लिंबायत जागेवरून भाजपच्या उमेदवार आहेत. मंगळवारी झाशीच्या राणीच्या आवेशात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी घोड्यावर बसून शहरातून फेरी काढली.

अहमदाबाद- राजकीय पक्ष संसदेत महिलांच्या ३३% आरक्षणावर जोरजोरात भूमिका मांडतात. मात्र, प्रत्येक निवडणुकीत तसे चित्र दिसत नाही. गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर भाजप व काँग्रेसचे १७५ उमेदवार मैदानात आहेत. यामध्ये केवळ ९ महिला उमेदवार आहेत. म्हणजे ५.१४%. भाजपने ६ व काँग्रेसने ३ महिलांना तिकीट दिले. यामध्ये एकही आदिवासी व मुस्लिम नाही. राज्यात एकूण मतदारांत ४७.८०% महिला आहेत.

 

  २०१२ मध्ये १९ महिला भाजप उमेदवार
- राज्यात १७ पेक्षा जास्त महिला आमदार राहिल्या नाहीत.
- भाजपने २०१२ मध्ये १९ महिलांना तिकीट दिले होते
- भाजपने २७ वर्षंात सर्वाधिक २२ महिला व काँग्रेसने १४ महिलांना २००७ मध्ये तिकीट दिले होते
- आनंदीबेन गुजरातच्या पहिल्या मुख्यमंत्री व १० वर्षे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या एकमेव महिला आहेत.
- पहिल्या टप्प्यात ज्या ८९ जागांवर निवडणूक होणार आहे,त्यात बहुतांश सौराष्ट्र व दक्षिण गुजरातमध्ये येतात.

 

हेही वाचा,

गुजरात निवडणूक: हार्दीक पटेल आणि उपमुख्‍यमंत्री नितीन पटेल यांची मुलाखत

 

 

बातम्या आणखी आहेत...