आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपची अंतिम यादी जाहीर, आनंदीबेन यांना तिकीट नाही; जिग्नेश मेवानी अपक्ष लढणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- भारतीय जनता पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी ३४ उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, विद्यमान मंत्री रोहित पटेल यांच्यासह पाच आमदारांना या यादीत स्थान नाही.


आनंदीबेन पटेल या अहमदाबाद शहरातील घाटलोडिया मतदारसंघाच्या आमदार आहेत. आपण निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा त्यांनी याआधीच केली होती. आणंद मतदारसंघातून विद्यमान मंत्री रोहित पटेल यांना तिकीट नाकारले आहे. ज्यांना तिकीट मिळाले नाही, अशा विद्यमान आमदारांमध्ये नागरजी ठाकोर (राधनपूर), आर. एम. पटेल (आसरवा) आणि विंछिय्या भुरिया यांचा समावेश आहे. काँग्रेसमधून भाजपत आलेल्या माजी आमदार तेजश्रीबेन पटेल यांना तसेच राज्यसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला मतदान करणारे काँग्रेसचे माजी आमदार करामशी मकवाना यांचे चिरंजीव कनू मकवाना यांनाही तिकीट देण्यात आले आहे. पक्षाने अंतिम यादीत १२ विद्यमान आमदारांना तिकीट दिले आहे.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, दलित नेते जिग्नेश मेवानी वडगाममधून अपक्ष लढणार...

बातम्या आणखी आहेत...