आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gulam Ali Accepted Invitation For Programme In Lucknow

गुलाम अलींच्या मैफलीचे लखनऊमध्ये आयोजन, आयोजकांचे निमंत्रण स्वीकारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - गझलसम्राट गुलाम अली यांंच्या पुणे-मुंबई मैफली उधळून लावल्यानंतर आता गुलाम अली लखनऊत गाणार आहेत. पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींनी लखनऊ महोत्सवाचे निमंत्रण स्वीकारले आहे. जिल्हा प्रशासनाने याला दुजोरा दिला. ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या समारंभात ते गाणार आहेत. ८ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील कार्यक्रमात गाण्याचेही त्यांनी पूर्वी मान्य केले होते. मात्र मला राजकीय वादंगात जायचे नाही, असे सांगून त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला. यापूर्वीचेही नियोजित कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्रातील विरोधानंतर रद्द केले होते.
लखनऊ महोत्सव समितीच्या सदस्यांनी गुलाम अलींच्या मुलाशी बातचीत केल्यानंतर ते ३ डिसेंबरला गाणार असल्याचे निश्चित झाले. बुधवारी रात्री १०.३० वाजता त्यांचे पुत्र आमिर यांनी ही निश्चिती कळवली असल्याचे जिल्हाधिकारी राजशेखर यांनी सांगितले. त्यांनी अधिकृत लेटरहेडवर तसेच व्हिडिआे संदेशाद्वारे येणार असल्याचे कळवले आहे. ७४ वर्षीय गुलाम अली मुंबई प्रकरणानंतर भारतात गाण्यास उत्सुक नव्हते.