आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K : भारतीय जवानांचे शिर कापायला आले होते दहशतवादी, दोन जवान शहीद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील तंगमर्ग भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली यात दोन जवान शहीद झाले आहेत. एक जवान जम्मू-काश्मीर पोलिसचा तर दुसरा भारतीय लष्करातील आहे. या चकमकीत काही स्थानिक देखील जखमी झाले आहेत.

तीन संघटना घुसखोरीच्या तयारीत
भारतीय गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तीन दहशतावादी संघटना घुसखोरीच्या तयारीत आहेत. त्यात हिजबूल, लष्कर आणि जैश या संघटनांचा समावेश आहे. तिन्ही संघटनांची एकत्र येऊन घुसखोरीचे षडयंत्र रचले आहे. प्रत्येक गटाचा एक म्होरक्या आहे, जो हल्ल्याची तयारी करीत आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून हल्ल्याची तयारी आहे. या दहशतवाद्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

लष्कराच्या तीन बटालियन आणि पोलिस निशाण्यावर
भारती हद्दीत दाखल झाल्यानंतर दहशतवाद्यांचा उद्देश लष्कराच्या छावण्या, पोलिस आणि सरकारी कार्यालयांना लक्ष्य करण्याचा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर लष्कराच्या दोन-तीन बटालियन आहेत. ही सुचना मिळाल्यानंतर लष्कराने सीमेवर चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. गेल्या महिन्यात जम्मू मध्ये दोन मोठे हल्ले झाले होते. त्यात लष्कराची छावणी आणि पोलिस स्टेशनवर हल्ला झाला होता. गेल्या वर्षी सीमेवर भारतीय सैनिकांचे शिर कलम करण्याच्या घटना घडल्या होत्या.
(फाइल फोटो)