आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनगरमध्ये CRPF पथकावर हल्ला करून शाळेत लपलेल्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगरच्या दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये दडून बसलेल्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा सुरक्षा दलाने केला. - Divya Marathi
श्रीनगरच्या दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये दडून बसलेल्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा सुरक्षा दलाने केला.
श्रीनगर - येथे दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये घुसलेल्या 2 दहशतवाद्यांना 14 तास चाललेल्या धुमश्चक्रीनंतर सुरक्षा दलाने कंठस्नान घातले. दरम्यान, पंथा चौकात शनिवारी सीआरपीएफच्या तुकडीवर लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना हल्ला केला होता. यात एक सब इन्स्पेक्टर शहीद झाले होते. गाडीवर गोळीबार केल्यानंतर दहशतवादी शाळेत लपले होते. दुसरीकडे, रविवारीच नियंत्रण रेषेनजीक नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
 
पहाटेपासून सुरू होती चकमक
- वृत्तसंस्थेनुसार, 14 तास चाललेल्या एन्काउंटरमध्ये गोळीबारादरम्यान 2 जवान जखमी झाले. सुरक्षा दलाने पूर्ण परिसराला वेढा दिलेला होता आणि शोध मोहीम राबवली होती.
- एक पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी पहाटे 3.40 वाजता सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान गोळीबार झाला.
- तत्पूर्वी, डीजीपी एस. के. वैद म्हणाले, दहशतवादी शाळेच्या इमारतीचे नुकसान करत होते. यामागे मुलांनी शाळेत येऊ नये हा त्यांचा उद्देश होता.
- इमारतीचे कमीत कमी नुकसान होण्यासाठी आम्ही शनिवारीच इमारत रिकामी करून घेतली होती.
 
ईदमुळे सूचना जारी
- पोलिसांनी ईदच्या नमाजबद्दल आपल्या जवानांना सूचना जारी केली आहे. पोलिसांनी जवानांना सांगितले की, जिल्ह्याची पोलिस लाइन्स किंवा सुरक्षा असलेल्या मशिदीतच नमाज अदा करावी. सुरक्षा नसलेल्या ठिकाणी नमाज अदा करू नये. पोलिस नियंत्रण कक्षाने संपूर्ण काश्मिरातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी ही सूचना जारी केली आहे.
- तथापि, गुरुवारी श्रीनगरच्या नोहट्टा येथील मशिदीत जमावाने मोहम्मद अय्युब पंडितला बेदम मारहाण केली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता. 
 
बातम्या आणखी आहेत...