आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुलवामामध्ये एन्काऊंटर :9 तासांच्या चकमकीत ‘लष्कर’चे 2 अतिरेकी ठार, एका मुलाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी दहशतवादी आणि सुरक्षा दले यांच्यात झालेल्या नऊ तासांच्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. या कारवाईत एक नागरिकही ठार झाला.  
 
पडगामपोरा गावात दोन दहशतवादी दडून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे सुरक्षा दलांनी बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमाराला गावाला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली. शेजारच्या दोन घरांत दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी पहाटे ४.४० च्या सुमाराला सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. ही चकमक सुमार नऊ तास चालली. या दोघांपैकी एका दहशतवाद्याने शरणागती पत्करावी म्हणून त्याचे मन वळवण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याच्या आईला घटनास्थळी आणले होते, पण त्याने नकार दिला. ठार झालेले दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित असून, त्यांची नावे जहांगीर गनई आणि मोहंमद शफी शेरगुजरी अशी आहेत. दोन्ही बाजूंच्या गोळीबारात मानेत गोळी घुसल्याने आमीर नझीर वनी या १५ वर्षीय किशोरवयीनाचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर काही समाजकंटक दक्षिण काश्मीरमधील रेल्वे मार्गाला लक्ष्य करण्याची भीती वाटल्याने प्रशासनाने बनिहाल ते श्रीनगरदरम्यानची रेल्वे सेवा तात्पुरती बंद केली होती.  
 
परस्परविरोधी दावे 
सुरक्षा दलांच्या जवानांनी घटनास्थळाजवळ निदर्शकांवर गोळीबार केला, त्यातच आमर वनी ठार झाला, असा दावा स्थानिक रहिवाशांनी केला. मात्र, गोळी लागून आमीर जखमी झाला, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. गोळी लागल्याने सज्जाद अहमद भट हा आणखी एक युवक जखमी झाला. त्याला येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...