चित्तूर/चेन्नई - आंध्रच्या चित्तूर जिल्ह्यात मंगळवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत २० चंदन तस्कर ठार झाले. मृतांपैकी १२ जण मजूर होते, असा दावा करून तामिळनाडूच्या राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केला. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानेही आंध्र सरकारला नोटीस पाठवली आहे.
शेषाचलम जंगल, चिकातिकोना इथागुंटात ही चकमक झाली. २०० तस्कर चंदनाची झाडे लाकडे घेऊन पलायन करत होते. पोलिसांनी त्यांना शरणागतीचे आवाहन केले. पण त्यांनी कुऱ्हाडी देशी कट्ट्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. पोलिसांना स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला.चिकातिकोनात ११ आणि ईथागुंटात तस्करांचा मृत्यू झाला.
चौकशीची मागणी
कारवाईवर तामिळनाडूतील अद्रमुक, द्रमुक, पीएमके, भाजपसह सर्वच पक्षांनी टीका केली. सीएम पनीरसेल्वम यांनी घटनेच्या त्वरित चौकशीची मागणी केली. पीएमके प्रमुख रामदौस म्हणाले की, स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला हा पोलिसांचा दावा पूर्णपणे खोटा आहे. आंध्र आणि तामिळनाडूच्या सरकारांनी मृतांच्या नातेवाइकांना भरपाई द्यावी, अशी मागणी द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी केली.