आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gurdaspur Bus Fell Into The Canal, Three Children Die, 25 Injured

गुरदासपूर: 40 फूट खोल नदीत कोसळली बस, मुलांचा मदतीसाठी आक्रोश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुर्घटनाग्रस्त बस - Divya Marathi
दुर्घटनाग्रस्त बस
गुरदासपूर - विद्यार्थ्यांनी भरलेली बस नदीत कोसळल्याने तीन मुले दगावली असून 25 विद्यार्थी जखमी आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी शहरानजीक पटियाल येथे फतेहगड चूडियां जवळ झाला. दुर्घटनेनंतर परिसरात लहान मुलांच्या रडण्याच्या आणि ओरडण्याच्या आवाजाने पाहाणाऱ्यांच्या अंगावर शहारे आले. या अपघाताने विद्यार्थी वाहतुकीसाठीच्या बसचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, एका गाडीने बसला टक्कर दिल्याने चालकाचे संतूलन गेले आणि बस 40 फूट खोल नदीत कोसळली. स्थानिकांनी त्वतरी मदत कार्याला सुरुवात केली आणि जखमी मुला-मुलींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अशीही माहिती पुढे आली आहे, की बसमध्ये 32 मुलांसाठीची आसनक्षमता असताना त्यात 55 विद्यार्थी बसवण्यात आले होते. दुसरीकडे सिव्हिल हॉस्पिटलने 12 गंभीर जखमी मुलांना अमृतसरला पाठवले.

शाळा प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड
शाळा प्रशासनाने कमी किंमतीत बस खरेदी करण्यासाठी भंगारातील बस विद्यार्थी वाहतुकीसाठी आणल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या राज्यातील भंगारात निघालेल्या बस राज्यात आणुन त्या विद्यार्थी वाहतुकीसाठी वापरल्या जातात, असे अनेकदा समोर आले आहे. या दुर्घटनेतही अपघात झालेली बस दिव आणि दमन येथील पासिंगची असल्याचे उघड झाले आहे.
- हायकोर्टाच्या आदेशानंतरही स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शाळांचे फावत आहे आणि ते इतर राज्यात भंगारात निघालेल्या बस वाहतुकीसाठी वापरत आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, दुर्घटनाग्रस्त बसचे फोटोज्..