आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरदासपूर : काँग्रेस 1.93 लाख मतांनी विजयी, 2014 नंतर दुसरी जागा भाजपने गमावली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजयानंतर जल्लोष करताना काँग्रेसचे कार्यकर्ते. - Divya Marathi
विजयानंतर जल्लोष करताना काँग्रेसचे कार्यकर्ते.
गुरदासपूर - पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा जागा काँग्रेसने भाजपकडून खेचली आहे. विनोद खन्ना यांच्या निधनानंतर रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे सुनील जाखड विजयी झाले. त्यांनी भाजपचे स्वर्ण सलारिया यांना १ लाख ९३ हजार मतांनी हरवले. विनोद खन्ना गुरदासपूरमधून १९९८, १९९९, २००४ आणि २०१४ असे चार वेळा निवडून आले होते. नोव्हेंबरमध्ये रतलाम-झाबुआ लाेकसभेची जागाही काँग्रेसनेच जिंकली होती.
 
काँग्रेस : विजयाचे महत्त्व
- हिमाचल, गुजरात निवडणुकीपूर्वी उत्साह वाढेल. { सीएम अमरिंदर सिंग यांच्यावर विश्वास कायम.
- मोदी सरकार व धोरणांवरील टीका अाणखी तीव्र होईल.
- या विजयाने लोकसभेत काँग्रेसचे खासदार ४५ वरून ४६. २०१४मध्ये २८२ जागा जिंकणाऱ्या भाजपची सध्याची सदस्य संख्या २७६ आहे.
 
सोनिया, राहुल गांधींसाठी ही दिवाळी भेट आहे. काँग्रेसच्या पंजाची ‘थप्पड की गूँज’ आता देशभर ऐकू येईल.
- नवज्योतसिंग सिद्धू, मंत्री, पंजाब
 
केरळमध्येही यश : वेंगारा विधानसभा जागेवर काँग्रेसच्या पाठिंब्यावर यूडीएफ व मुस्लिम लीगचे उमेदवार के. एन. ए. खादेर विजयी झाले.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...