आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रद्युम्न हत्या प्रकरण: संतप्त पालक रस्त्यावर, शाळेत तोडफोड; पोलिसांकडून लाठीमार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संतप्त पालकांनी तोडफोड केली. - Divya Marathi
संतप्त पालकांनी तोडफोड केली.
नवी दिल्ली/गुडगाव- गुडगावच्या रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलाची हत्या झाल्याच्या घटनेमुळे संतप्त झालेले लोक रविवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी शाळेत तोडफोड केली तसेच जवळच्या एका दारू दुकानाला आगही लावली. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. आंदोलन करणाऱ्यांमध्ये शाळेत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे पालकही होते. 
 
प्रद्युम्नच्या हत्येची सीबीआयमार्फत चौकशी करावी या मागणीसाठी शेकडो नागरिकांनी रविवारी शाळेच्या बाहेर निदर्शने केली आणि शाळेजवळील दारूच्या दुकानाला आग लावली. पोलिसांनी निदर्शकांवर लाठीमार केला आणि २० जणांना ताब्यात घेतले. निदर्शनांच्या वेळी काही पत्रकारही जखमी झाले. त्यांच्या कॅमेऱ्यांचे नुकसान झाले आहे.  याप्रकरणी हरियाणाचे शिक्षणमंत्री रामविलास शर्मा म्हणाले, “”शाळेच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. मालक-व्यवस्थापनाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पीडिताच्या आई-वडिलांचे समाधान झाले नसेल तर सरकार कोणत्याही संस्थेकडून तपास करू शकते. दरम्यान, याप्रकरणी नेमलेल्या समितीचा अहवाल सादर झाला असून, रेयान स्कूलमध्ये अनेक कमतरता आढळल्या आहेत.

सीबीआयनेही समांतर तपास करावा, हिंसा करू नका : प्रद्युम्नच्या पित्याचे आवाहन
प्रद्युम्नचे वडील वरुण ठाकूर यांनी मुलाच्या हत्येची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी पुन्हा केली आहे. त्यांनी हत्येमागे शाळेच्या प्रशासनाचा ‘मोठा कट’ असावा, अशी शंका व्यक्त केली. ते म्हणाले ,“ पोलिस आपले काम करत आहेत. या प्रकरणाशी संबंधित सर्व मुद्द्यांचा खुलासा व्हावा यासाठी सीबीआयनेही समांतर तपास करावा, अशी आमची विनंती आहे.” वरुण यांनी प्रद्युम्नसाठी न्यायाच्या लढ्यात सहभागी झालेल्या सर्व पालकांना हिंसा न करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “माझ्या मुलाबाबत जे घडले ते पुढे कोणाबाबतही होऊ नये. मी हात जोडून पालकांना विनंती करत आहे की, आपण उपद्रवी नाही. आपण मुलांचे पालक आहोत. आपल्या मुलाबाबत असे काही होऊ नये, असे प्रत्येकाला वाटत आहे. तरी कृपया कोणीही तोडफोड, मारहाण किंवा हिंसेच्या मार्गाचा अवलंब करू नये. हे चुकीचे आहे. आपण शांततेने निदर्शने करू.” 

दिल्लीतील शाळेत पाचवर्षीय मुलीवर अत्याचार, न्यायिक चौकशी होणार   
दिल्लीच्या शहादरा भागातील गांधीनगरच्या एका खासगी शाळेत शनिवारी पाचवर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. शाळेच्या स्टोअर रूममध्ये एका शिपायाने या मुलीवर अत्याचार केला. मुलगी या घटनेनंतर खूप घाबरलेली होती. तिची स्थिती पाहून पालकांना संशय आला. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. विवेक विहारच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चौकशी होणार असून तीन दिवसांत अहवाल सादर केला जाईल. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घटना अत्यंत लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, अशा प्रकारची घटना सहन केली जाणार नाही. पोलिस आपले काम करत आहेत. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व शाळांसाठी नियम तयार केले जातील. शाळांना या नियमांची कडक अंमलबजावणी करावी लागेल. दरम्यान, प्रद्युम्नच्या हत्येनंतर लगेचच हा प्रकार घडल्याने राजधानी नवी दिल्लीत संताप व्यक्त होत आहे.

एकही वकील लढणार नाही खटला 
शनिवारीगुरगाव बार असोसिएशनने दुसरीतील विद्यार्थी प्रद्युम्नच्या हत्येचा आरोपीचा खटला लढवण्याचा निर्णय घेतला. ही माहिती बार असोसिएशन सोहनाचे अध्यक्ष रजनीश अग्रवाल यांनी दिली. 

चिमुकल्याच्या हत्येचा घटनाक्रम 
- सकाळी 7.55 वाजता वरुण ठाकूर हे त्यांचा 7 वर्षांचा मुलगा प्रद्युम्न आमि मुलगी विधि (10) यांना बाइकवर शाळेच्या गेटपर्यंत सोडून घरी परत आले. 
- 8.10 वाजता शाळा प्रशासनाकडून त्यांना फोन आला. त्यांनी सांगितले तुमच्या मुलाचे ब्लडिंग होत आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो आहे. तुम्ही ताबडोब या. 
- त्यानंतर वरुण त्यांचे शेजारी संजय जैना, संजय कुमार, अजीत दुबे यांच्यासह हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी घाईघाईने निघाले. मात्र कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायचे आहे हे सांगण्यात आले नाही त्यामुळे त्यांनी परत शाळेत फोन केला. फोन कोणीच रिसिव्ह केला नाही. त्यामुळे ते प्रथम शाळेत गेले. 
- 8.30 वाजता ते शाळेत पोहोचले तेव्हा सांगण्यात आले मुलाला आर्टिमिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. 
- 9 वाजता हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की मुलाचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी शाळा प्रशासनाच्या वतीने या घटनेची माहिती भोंडसी पोलिसांना देण्यात आली. 
- 9.30 वाजता भोंडसी पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर 10.30 वाजता पोलिस आयुक्त सोहना रेयान शाळेत पोहोचले. 11 वाजता फॉरेन्सिक टीमही शाळेत दाखल झाली. 
 
एक-एक करत मुलांना वर्गाबाहेर काढले
- 11.15 वाजता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. शाळेत पोलिसांची वर्दळ वाढली, त्यानंतर शाळेने मुलांना सुटी दिली. तोपर्यंत मुलाच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. 
- 11.30 वाजता शाळेचे मेन गेट बंद करण्यात आले. यावेळी काही लोक शाळेत घुसण्याचा प्रयत्न करत होते. ते सर्व पालक होते आणि आपल्या मुलांना घेण्यासाठी आले होते. मात्र पोलिसांनी पालकांना प्रवेशबंदी केली, त्यामुळे संतप्त पालकांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. 
- लोकांनी यावेळी पोलिस उपनिरीक्षकांना धक्का-बुक्कीही केली. पोलिसांनी पालकांना शांततेचे आवाहन केले. 
-11.50 वाजता फॉरेन्सिक टीम तपास करत होती. त्यावेळी डीसीपी सिमरदीपसिंह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे कुठे-कुठे आहेत याची पडताळणी केली. त्यांच्या निदर्शनास आले की बाथरुम समोरील गॅलरीमध्ये एकही कॅमेरा नाही. तर, दुसरीकडे बाहेरून लावलेला कॅमेरा बंद आहे.
बातम्या आणखी आहेत...