आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुडगाव स्कूल मर्डर: रक्ताने माखलेल्या मुलाला आरोपीने उचलून घेतले होते - प्रत्यक्षदर्शी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुसरीत शिकत असलेल्या मुलाची शुक्रवारी रेयान स्कूलच्या टॉयलेटमध्ये डेडबॉडी सापडली होती. - Divya Marathi
दुसरीत शिकत असलेल्या मुलाची शुक्रवारी रेयान स्कूलच्या टॉयलेटमध्ये डेडबॉडी सापडली होती.
गुडगाव - रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये 7 वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी प्रथमच प्रत्यक्ष साक्षीदार समोर आला आहे. सुभाष गुप्ता हे पालक त्यांच्या मुलाची फिस भरण्यासाठी शाळेत आलेले होते. सुभाष यांनी माध्यमांना सांगितले की, ते रिसेप्शनजवळ हजर होते. तेव्हा त्यांनी आरोपी बस कंडक्टर अशोकला पाहिले होते. त्याचे शर्ट रक्ताने माखलेले होते. मी त्याला शर्ट तसेच ठेवण्यासा सांगितले होते, मात्र त्याने ते शर्ट धुवून टाकले. सुभाष यांच्या म्हणण्यानुसार, अशोकच्या चेहऱ्यावर ना भीतीचे, ना पश्चतापाचे भाव होते. मुलाचा मृतदेह शाळेच्या एका शिपायाच्या हातात होता. त्याचा चेहरी कपड्याने झाकलेला होता. 
 
सर्व प्रथम काय पाहिले? 
- सुभाष यांनी सांगितले, की मी रिसेप्शनजवळ उभा होतो तेव्हा एका शिपायाने रक्ताने माखलेल्या वॉशरुममधून उचलून बाहेर आणले होते. तेव्हा काही शिक्षिका तिथे रडत होत्या.
- सुभाष यांच्या म्हणण्यानुसार शाळेच्या प्राचार्य ही तेव्हा तिथेच होत्या. आरोपी बस कंडक्टर अशोक देखील तिथेच होता. त्याचा शर्ट रक्ताने माखलेला होता. प्राचार्यांनी ड्रायव्हरला आवाज दिला आणि गाडी काढण्यास सांगितली. 

शाळेच्या गाडीतूनच हॉस्पिटलला नेले 
- सुभाष म्हणाले, मुलाला शाळेच्याच गाडीतून शाळेच्या स्टाफने हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर रिसेप्शनवरुन मुलाच्या वडिलांना फोन केला. सुभाष यांचा आरोप आहे की मुलाच्या वडिलांना काय घडले, हे सांगितलेच गेले नाही. त्यांना फक्त एवढेच सांगितले की तुमच्या मुलाला लागले आहे, तुम्ही अंजू मॅमसोबत बोलून घ्या. त्याच तुम्हाला सर्वकाही सांगतिल. 
 
शाळा प्रशासनाकडे पोलिसांचा नंबरही नव्हता
- सुभाष यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी रिसेप्शनवरील महिलेला सांगितले की तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना द्या. मात्र त्यांच्याकडे पोलिसांचा फोन नंबरच नव्हता. सुभाष यांनी सांगितले की त्यांनी स्वतःच पोलिस स्टेशनला फोन करुन माहिती दिली. 
 
कॉरिडोर पुसून घेतला 
- सुभाष यांनी माध्यमांना सांगितले की मी वॉशरुमचा दरवाजा बंद केला. तेव्हा कॉरिडोरमध्ये रस्त सांडलेले होते. मी स्टाफला सांगितले की हे सर्व असेच राहू द्या. रक्ताचे डाग पुसू नका. मात्र त्यांनी माझे ऐकले नाही. 
 
आरोपीने मुलाला उचलून गाडीत ठेवले 
- सुभाष यांच्या म्हणण्यानुसार, एका शिपायासह आरोपी कंडक्टरने मुलाला उचलून घेतले होते. त्याचे शर्ट रक्ताने माखलेले होते. त्याने शर्ट धुतल्यानंतर सुभाष यांनी त्याला खूप सुनावले त्यावर तो म्हणाला होता, फार दुर्गंधी सुटली होती त्यामुळे शर्ट धुतला. 
 
आरोपीच्या चेहेऱ्यावर जराही भीती नव्हती
- सुभाष गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार आरोपी कंडक्टरच्या चेहऱ्यावर थोडीही भीती दिसत नव्हती. थोड्याच वेळात तिथे पोलिस दाखल झाले. त्यांनी तर आरोपी कंडक्टरला काही विचारलेही नाही. किंवा कोणाला अशी शंकाही नव्हती की मुलाचा मृत्यू झाला आहे. 

काय आहे प्रकरण 
- गुडगाव येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये 8 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वर्षांच्या मुलाचा शाळेच्या टॉयलेटमध्ये मृतदेह सापडला होता. हत्याच्या आरोपात शुक्रवारी सायंकाळीच शाळेचा बस कंडक्टर अशोक कुमारला अटक करण्यात आले होते. आरोपी अशोक 8 महिन्यांपूर्वीच शाळेत कामाला लागला होता. 
- अशोकने माध्यमांना सांगितले की माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी टॉयलेटमध्ये चुकीचे काम करत होतो. ते मुलाने पाहिले आणि मग मी त्याला धक्का दिला. नंतर आत ओढले. तर तो ओरडाओरड करायला लागला. त्यामुळे घाबरून मी चाकूने त्याचा गळा चिरला. 
- मुलाच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...