आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DB INVESTIGATION: क्लासरुमपासून 30m असलेल्या वॉशरुममध्ये झाली मुलाची हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरियाणा सरकारने मुलांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. - Divya Marathi
हरियाणा सरकारने मुलांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुडगाव/मुंबई  - येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या वॉशरुममध्ये शुक्रवारी (8 सप्टेंबर) दुसरीतील मुलाची हत्या झाली होती. वॉशरुमपासून 30 मीटर अंतरावरच क्लासरुम आहे. अशावेळेस इतरांना 7 वर्षांच्या प्रद्युम्नचा ओरडण्याचा आवाज कसा आला नसेल? दैनिक भास्कर टीने या संपूर्ण परिसराची घटनास्थळी जाऊन पाहाणी केली आहे. शाळेच्या रिसेप्शनपासून दुसरीच्या वर्गाचा मार्ग हा वॉशरुमसमोरुनच जातो. त्यामुळे मुलगा क्लासमध्ये जाण्यापूर्वीच त्याची हत्या करण्यात आली नसेल कशावरुन, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  दरम्यान, रेयान इंटरनॅशनल स्कूलचे सीईओ रेयान पिंटो, ऑगस्टीन पिंटो आणि ग्रेसी यांची अटक उद्यापर्यंत टळली आहे. महाराष्ट्र सरकारने पिंटो परिवाराच्या विरोधातील याचिकेच्या तयारीसाठी एक दिवसाची मुदत मागितली आहे. हरियाणा पोलिसांचे एक पथक रेयानच्या संचालकांच्या चौकशीसाठी मुंबईत आले आहे. 
 
 
प्रद्युम्नच्या हत्येनंतर राज्याचा शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे. हरियाणा सरकारने शिक्षण कायद्यात आता विद्यार्थी सुरक्षा हा मुद्दा नव्याने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची तयारीही राज्य सरकारने सुरु केली आहे. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 18 मुद्दे यात समाविष्ट केले जाणार आहे. 
 
घटनास्थळी काय आढळले
- सोमवारी दुपारी 12.20 वाजता आमची टीम रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये पोहोचली. सगळीकडे पोलिस तैनात होते. 
- शाळेच्या रिसेप्शनजवळ पोहोचल्यानंतर पाहिले की काही पोलिस अधिकारी सोफ्यावर बसलेले होते. 
- त्यानंतर, जिथे मुलाची हत्या झाली होती त्या वॉशरुमजवळ आम्ही पोहोचलो. वॉशरुमच्या दरवाजाला कुलूप लावलेले होते, मात्र फरशीवर अजूनही रक्ताचे डाग होते. वॉशरुमच्या मागील खिडकी तुटलेली होती. 
- 12.30 वाजता आम्ही मुलाच्या क्लासरुममध्ये पोहोचलो. येथे 10-12 पोलिस हजर होते. 
- क्लासरुम आणि वॉशरुम यामध्ये अवघे 30 मीटर अंतर आहे. वॉशरुमच्या गॅलरीला लागून पहिलीचा वर्ग आहे. त्यामधून पायऱ्या आहे. त्यानंतरची रुम दुसरी A ची आहे. येथे प्रद्युम्न शिकत होता. 
- रिसेप्शनपासून दुसरीच्या वर्गात जाण्याचा मार्ग वॉशरुमसमोरुन जातो. त्याशिवाय वॉशरुमला दुसरे गेट आहे, ते सोमवारी बंद होते. 
- त्यामुळे वर्गात जाण्याआधीच  प्रद्युम्नची हत्या करण्यात आली होती, ही शक्यता नाकारता येत नाही. 
बातम्या आणखी आहेत...