आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेयान स्कूल: CBI करणार खुनाचा तपास; 3 महिन्यांपर्यंत शाळा सरकारच्या ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव -रेयान इंटरनॅशनल स्कूलमधील दुसरीतील प्रद्युम्नच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्याची घाेषणा  हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शुक्रवारी केली. पोलिसांच्या तपासाबाबत शंका असेल तर हा तपास सीबीआयकडे का सोपवला जात नाही, अशी विचारणा पंतप्रधान कार्यालयाने केल्यानंतर खट्टर यांनी लगेच ही घोषणा केली. तसेच भोंडसी येथील रेयान शाळा येत्या तीन महिन्यांपर्यंत राज्य सरकारच्या ताब्यात राहणार असून जिल्हाधिकारी विनित प्रतापसिंग यांच्याकडे या शाळेचा पदभार सोपवण्यात आला आहे. ते शाळेतील  सावळ्या गोंधळांची चौकशी करून दाेष दूर करतील, असेही त्यांनी सांगितले. 
 
पुढे काय होणार?
- हरियाणा सरकार सीबीआयला पत्र पाठवणार. त्यानंतर सीबीआय गुन्हा नोंदवून तपास सुरू करेल. यामध्ये दोन-तीन दिवस जातील. 
- तपासाचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी शाळेवर  अधिकारी नेमतील. तीन महिन्यात शाळेतील उणिवा दूर करण्यात येतील.
 
पिंटो कुटुंबीयांच्या परदेशवारीवर निर्बंध...
- तत्पूर्वी, मुंबई हायकोर्टात बुधवारी रेयान स्कूलचे ट्रस्टीजचा अंतरिम जामिनावर सुनावणी झाली. सीईओ रेयान पिंटो आणि त्यांचे आई-वडील ऑगस्टीन पिंटो, ग्रेस पिंटो यांना एका दिवसाचा दिलासा मिळाला आहे.
- कोर्टाने तिघांनाही विदेशात जाण्यावर रोख लावली आहे. दुसरीकडे, गुरुवार संध्याकाळपर्यंत गुडगाव हायकोर्टानमध्ये अपली करण्यासाठी सांगितले आहे. गुडगावमध्ये एसआयटीने हरपाल याच्याशिवाय सेक्शन इनचार्ज अंजू डुडेजा, निलंबित कार्यकारी प्रिन्सिपल नीरजा बत्रा, माजी प्रिन्सिपल राखी वर्मा, बस ड्रायव्हर सौरभ राघव, बस काँट्रॅक्टर हरकेश प्रधान आणि 8 सुरक्षा रक्षकांची चौकशी केली. 
 
खटल्याची सुनावणी हरियाणाच्या बाहेर करण्याची अपील...
- दुसरीकडे, शाळा प्रशासनाचे वकील केटीएस तुलसी यांनी सुप्रीम कोर्टाला या केसची सुनावणी हरियाणाच्या बाहेर दिल्लीच्या साकेत कोर्टात करण्याची विनंती केली. सुप्रीम कोर्टात याप्रकरणी 18 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.  
 
या नियमांनुसार अधिग्रहण
- के.के. खंडेलवाल गुरुवारी मीडियासोबत बोलताना म्हणाले, 'शाळेच्या कारभारात अनियमीतता आढळून आल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नियमांचे पालन केले नाही तर शाळा टेक ओव्हर करण्याचीही कारवाई केली जाऊ शकते.'
- 'राज्य सरकार शिक्षकांच्या समस्येवरही संवेदनशील आहे. त्यासोबतच शिक्षकांची जबाबदारीही निश्चित करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. त्यासाठी गट शिक्षण अधिकाऱ्यांना अचानक तपासणीचे अधिकार देण्यात आले आहे. यामुळे शिक्षकांचे काम चोख राहिल.'
 
काय आहे प्रकरण
- गुडगाव येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये 8 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वर्षांच्या मुलाचा शाळेच्या टॉयलेटमध्ये मृतदेह सापडला होता. हत्याच्या आरोपात शुक्रवारी सायंकाळीच शाळेचा बस कंडक्टर अशोक कुमारला अटक करण्यात आली होती. आरोपी अशोक 8 महिन्यांपूर्वीच शाळेत कामाला लागला होता. 
- अशोकने माध्यमांना सांगितले की माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी टॉयलेटमध्ये चुकीचे काम करत होतो. ते मुलाने पाहिले आणि मग मी त्याला धक्का दिला. नंतर आत ओढले. तर तो ओरडाओरड करायला लागला. त्यामुळे घाबरून मी चाकूने त्याचा गळा चिरला. 
- मुलाच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...