आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gurmeet Ram Rahim Singh Dera Pamukh Per Month Earning 922 Crores By Devotion Service

90 लाख सेवेकऱ्यांची 10% कमाई घेत होता राम रहीम, महिन्याकाठी असे कमवायचा 922 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत (हरियाणा) - साध्वी बलात्कार प्रकरणात दोषी आढळलेल्या रामरहीमने लोकांच्या चांगुलपणाच्या नावावर गुरूंनी बनवलेली संस्था डेरा सच्चा सौदाला खासगी कमाईचा मार्ग बनवले होते. बॅंक खाते नसताना, ट्रान्झॅक्शन आणि रेकॉर्डचेच हा बाबा दर महिन्याला तब्बल 922 कोटी रुपये उकळत होता. हा पैसा हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या डेऱ्यामधील 90 लाख कायमस्वरूपी सदस्यांच्या सेवेच्या नावावर तो कमवत होता. या सदस्यांमध्ये 25 हजार डेरा अधिकारीही सामील होते.
डेऱ्यामधील एका अधिकऱ्याच्या मते, देशापेक्षाही वेगळा डेऱ्यामध्ये एक स्वतंत्र कायदा होता.
 
'कॉर्पोरेटलाही थक्क करणारी बाबाच्या कमाईची पद्धत' जी कुणालाच माहिती नाही...
- डेऱ्याचे अधिकारी आणि कायस्वरूमी मेंबर्स बनण्यासाठी कमाईची 10% रक्कम महिन्याकाठी सेवेच्या नावावर द्यावी लागत असे. असेच लोक येथे अधिकारी बनवले जात होते, ज्यांची कमाई 1 लाखाच्या वर आहे आणि ते कायमस्वरूपी मेंबर्स बनत होते. ते कमीत कमी 10 हजार रुपये महिन्याकाठी कमवायचे.
- सेवेच्या नावावर दान करण्यासाठी बाबा तीन राज्यांमध्ये स्पर्धाही घेत होते.
जे राज्य पुढे जात होते, त्या अधिकाऱ्यांना इव्हेंटमध्ये विशेष महत्त्व दिले जात होते.
- डेऱ्यामध्ये दरवर्षी तीन मोठे इव्हेंट होत होते. 15 ऑगस्टला बाबाचा वाढदिवस, 23 सप्टेंबरला तो गादीवर बसला तो दिवस आणि शाह सतनामजी यांचा वाढदिवस. यामध्ये जवळ-जवळ 30 लाख लोक एकत्र येत होते.
- डेऱ्यामध्ये सेक्रेटरीच्या पोस्टवर राहिलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, जे लोक दर महिन्याला पैसे देऊ शकत नव्हते, त्यांना लॉकेट घालायला लावून काम करवून घेत होता.
 
खरेदीदार, सामान आणि दर सर्व काही डेराच ठरवत होता
- राज्याच्या सर्व जिल्ह्यामधील 5 अधिकाऱ्यांसहित 61 मेंबर्सची कमिटी बनवली जात होती. ज्यामध्ये जिल्हा प्रमुख, जनरल सेक्रेटरी, कॅशियर, सेक्रेटरी आणि असिस्टंट सेक्रेटरी सामील होते. याव्यतिरिक्त एका टीममध्ये 11 मेंबर्सची टीम व एक 45 मेंबर्सची टीमही बनवली जात होती.
- ही टीम नाव चर्चा घरांचे मेंबर्स जोडण्यासाठी आणि प्रचार-प्रसार करते. हे अधिकारी दरमहिन्याला सोवेसाठी दान करत असतात. 
 
नामचर्चा घरांमधून आठवड्याला येत असायचा पैसा
- हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या जिल्ह्यामध्ये 300 हून असे घर चर्चेत आहे. तेथे दर रविवारी बाबाच्या नामावर चर्चा होत होती. हे जिल्ह्याचे 63 लोक करत होते.
- नामचर्चेच्या दरम्यान डेराप्रेमी श्रद्धेनुसार 10, 20 व 50 रुपये दान करत होते. येथे भक्तांनी मोठ्या संख्येने येण्यासाठी त्यांना विविध तऱ्हेने समजावले जायचे.
बातम्या आणखी आहेत...