आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gurudaspur Attack: Terrorists Wanted Attack On Civil Residents

गुरुदासपूर हल्ल: नागरी वस्त्यांवर हल्ले करण्याचे दहशतवाद्यांचे कारस्थान होते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुदासपूर / नवी दिल्ली - पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये सोमवारी दहशतवादी हल्ला करणारे तीन दहशतवादी शहरातील नागरी वसाहतींवरही हल्ला करण्याच्या बेतात होते. तिन्ही दहशतवाद्यांना पंजाब पोलिस व सुरक्षा जवानांनी १२ तासांच्या चकमकीनंतर दिनानगर पोलिस ठाण्यात ठार केले. त्यांच्याकडून मिळालेल्या दोन जीपीएस उपकरणांच्या आधारे तपास अधिका-यांनी हा दावा केला आहे.

हे दहशतवादी भारतात कोणत्या मार्गे घुसले याबाबत मात्र वेगवेगळे दावे केले जात आहेत. हे तिन्ही दहशतवादी रावी नदी मार्गे भारतात आले होते. ही नदी हिमाचल प्रदेशातून जम्मू सीमेवरून माधोपूरला (पंजाब) येते. गुरुदासपूरच्या पुढे पाकिस्तानातील चिनाब नदीला मिळण्याआधी तीन ठिकाणी रावी नदी तीन वेळा भारत - पाक सीमेत मधे -बाहेर होते. पाण्याचा वेगही खूप असतो. त्यामुळे घुसखोरीसाठी दहशतवाद्यांनी या भौगोलिक बदलांचा तसेच नाल्यांचा फायदा घेतला असावा, असा यंत्रणेचा अंदाज आहे. दहशतवाद्यांच्या जीपीएसवर तलवंडी पॉइंट, परमानंद गाव, दीनानगर व अन्य एका जीपीएसचवर गुरुदासपूर नागरी वस्ती आदी पॉइंट दिसत आहेत. पोलिस ठाण्याच्या परिसरातून सुरक्षा यंत्रणेने मंगळवारी दोन हातगोळे जप्त केले आहेत. परिसरात सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे.
माहिती असूनही आयबी फेल; पुन्हा इशारा जारी
गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांच्या माहितीनुसार आयबीला याची कल्पना आली होती की, सीमेपलिकडे दहशतवादी संघटना भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. तशा हालचाली सुरू आहेत. त्याची कल्पना असूनही हा हल्ला वेळीच रोखण्यात आयबीला अपयश आले. दहशतवादी या मार्गे घुसखोरी करू शकतात, हे माहित असूनही त्याबाबत आयबीने केवळ एक अलर्ट जारी केला. आगामी काळात गुरुदासपूर हल्ल्यासारख्या आणखीही एखादी घटना घडू शकते, असा अलर्ट आयबीने नव्याने जारी केला आहे.

पाक उच्चायुक्तांची भेट बादलांकडून रद्द
चंदिगड | पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी दिनानगरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्यासोबत होणारी सदिच्छा भेट रद्द केली आहे. मुख्यमंत्र्यांचे माध्यम व राष्ट्रीय प्रकारणांचे सल्लागार हरचरण बैंस यांनी ही माहिती िदली. बासित २९ जुलै ते एक ऑगस्ट या कालावधीत चंदिगडला येणार आहेत. या काळात त्यांची व बादल यांची भेट होणार होती.

पुढे वाचा.. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन दहशतवादी कैद