आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांनी विकली दीड कोटींची जमीन; आईची मात्र उपासमार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - पाच मुलांची आई असलेल्या ८० वर्षीय आईची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असल्याने उपासमार होत आहे. कहर म्हणजे मुलांनी कुटुंबाच्या नावावर असलेली दीड कोटी रुपयांची जमीन विकून तो पैसा आपसात वाटून घेतला अाहे. आईला सांभाळण्याची वेळ आली तेव्हा तिची जबाबदारी घ्यायला कुणीही पुढे आले नाही. मुलांच्या या वागणुकीने त्रासलेल्या आईने अखेरीस िजल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील ही घटना आहे. आईची दयनीय अवस्था पाहिल्यानंतर पोलिसांच्या कौटुंबिक समन्वय विभागाने त्या महिलेच्या पाचही मुलांना बोलावून घेतले. पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर त्यांना पुन्हा बोलावून त्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. शांतीदेवी या महिलेच्या पतीचे अनेक वर्षांपूर्वी निधन झाले. बिजौलीमध्ये त्यांची वडिलोपार्जित जमीन होती. पतीच्या मृत्यूनंतर मुलांनी १३ गुंठे जमीन दीड कोटी रुपयांना विकली. या व्यवहारातून मिळालेले पैसे त्यांनी आपसांत वाटून घेतले. त्यातही एका मुलाने जास्त रक्कम घेतली, तर दुसऱ्याला काहीही दिले नाही, असे वृद्धेचे म्हणणे आहे. पाचही मुलांमध्ये वाटणीवरून अजूनही वाद सुरू आहे. त्यामुळे वृद्ध आईचा सांभाळ करणे, तिला आपल्याजवळ ठेवण्यासाठी िकंवा तिला किमान खाण्यापिण्याचा खर्च देण्याचे सौजन्यही कुणी दाखवायला तयार नाही. त्याबाबत मुलांनी जबाबदारी झटकल्याने तिला वेगळे राहावे लागत असून तिच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
बातम्या आणखी आहेत...