आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायीच्या मालकीवरून ग्वाल्हेरमध्‍ये भांडण; तोडगा न निघल्याने गायीची रवानगी पोलिस ठाण्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - गायीच्या मालकीवरून ग्वाल्हेरमध्ये दोन गटांत भांडण लागले. दोन्ही बाजूच्या लोकांनी मंगळवारी मंदिरात शपथा घेऊन गायीवर हक्क सांगितला. बराच वेळ वाद सुरू होता. तोडगा निघत नसल्याचे पाहून पोलिसांनीच गाय खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर दोन्ही गट राजी झाले. दोन हजारांत पोलिसांनी गाय खरेदी केली. या पैशातून पोलिस ठाण्यातच ३० सप्टेंबर रोजी भंडारा होणार आहे. दोन्ही गट यात सहभागी होतील.

गायीच्या मालकीवरून जगदीश पाल आणि जीवन सौदेसाई यांच्यात भांडण लागले. दोघेही रात्रीच जनकगंज पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी समेट घडवून आणण्यासाठी मार्ग काढला. घरापासून शंभर मीटरवर गायीला सोडायचे आणि ती ज्याच्या घरी जाईल तो मालक असे समजले जाईल, असा फाॅर्म्यूला होता. परंतु त्यावर दोन्ही गटांत सहमती झाली नाही.मग पोलिस अधिका-यांनी गायीची बाजारातील किंमत विचारली.

लोकांनी दोन ते अडीच हजार रुपये असल्याचे सांगितले. अधिका-याने लगेच दोन हजार रुपये दोन्ही गटांच्या समोर मंदिरात ठेवले. या पैशातून भंडारा करण्याचे या वेळी ठरले. आता गायीचे पालनपोषण ठाण्यातच केले जाणार असून, ३० सप्टेंबर रोजी भंडारा होणार आहे. यात दोन्ही गटांचे लोक सहभागी होतील.