आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडील बेपत्ता झाल्याने निराश मुलीची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर - केदारनाथ यात्रेवर गेलेल्या व बेपत्ता आई-वडिलांची माहिती न मिळाल्याने निराश मुलीने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी उजेडात आली. ममता असे या मृत मुलीचे नाव आहे. तिचे आई-वडील पाच जून रोजी केदारनाथला गेले होते. या काळात ममता 15 जूनला माहेरी आली होती.
16 जूनला उत्तराखंडमधून पुराची बातमी आली होती. त्यानंतर ममताचे पती सासू-सासर्‍यांच्या शोधात हरिद्वारला गेले, परंतु तोपर्यंत त्यांची माहिती मिळाली नाही. दुपारी ममता मंशादेवीच्या मंदिरात गेली. सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करून ती परतली. घरी आल्यावर तिने स्वयंपाक तयार केला. सायंकाळी त्याच खोलीत तिचा मृतेदह फासावर लटकताना दिसून आला. ममताने आई-वडिलांशी 15 जून रोजी शेवटचे संभाषण केले होते. तेव्हा ते गौरीकुंडमध्ये होते.