नवी दिल्ली- नॉर्थ दिल्लीच्या सदर बाजारमध्ये सुपारी किलरने बॅंकेच्या कॅशिअरला सर्वांसमोर विषारी इंजेक्शन दिले. त्यानंतर रात्रभर कॅशिअर हॉस्पिटलमध्ये तडफडत होता. सकाळी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी सुपारी किलर फिजियोथेरपिस्ट आणि जिम ट्रेनरला अटक केली. पोलिस चौकशीत आरोपींनी सांगितले, की लग्नानंतर गर्लफ्रेंडचा परत मिळवण्यासाठी त्याने दीड लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यानुसार तिच्या पतीला विषारी इंजेक्शन देण्यात आले.
हत्येचा नवीन प्रकार
- रवी कुमार (35 वर्षे) कोटक महिंद्रा बॅंकेच्या सदर बाजार ब्रांचमध्ये कॅशिअर होता. शनिवारी सायंकाळी तो प्रतापनगर येथील निवासस्थानी जाण्यासाठी निघाला होता. यावेळी त्याचा एक मित्र सोबत होता.
- यादरम्यान कुणीतरी त्याच्या मानेत एक इंजेक्शन घुसवले. तो बेशुद्ध होऊन खाली पडला. मित्रांने आरडा ओरड केली. लोकांनी इंजेक्शन देणाऱ्याला पकडले. रवीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्याने दुसऱ्या दिवशी जीव सोडला.
- रवीचे वडील मैनपुरीत राहतात. ते निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. गुडगावमधील एक मॉलमध्ये अनेक वर्षे नोकरी केल्यानंतर 2013 मध्ये त्याला बॅंकेत नोकरी लागली होती.
रवीला मारण्यासाठी 4 महिने रेकी
- सुपारी किलर प्रेमसिंह फिजियोथेरेपिस्ट आहे. जिम ट्रेनर अनिश यादव याने त्याला रवीला ठार मारण्यासाठी सुपारी दिली होती. रवीला कोणत्या विषाचे इंजेक्शन देण्यात आले आहे याची माहिती मेडिकल स्पेशालिस्टकडून घेण्यात येत आहे.
- रवीला विषाचे इंजेक्शन देणारा प्रेमसिंह याच्यासोबत रवीच्या पत्नीची मैत्री होती. आरोपी प्रेमसिंह ऑक्टोबरपासून रवीची रेकी करत होता. यापूर्वीही त्याने एकदा हल्ला केला होता. पण रवीची जीव वाचला होता.
मोनिकाला मिळवण्यासाठी दिली सुपारी
- पोलिस चौकशीत प्रेमसिंहने कबुल केले, की अनिशने दिलेल्या सुपारीनुसार रवीची हत्या केली. त्यासाठी मला दीड लाख रुपये मिळाले.
- अनिशने सांगितले, की माझे रवीच्या पत्नीवर प्रेम होते. जुलै 2016 मध्ये तिने रवीशी लग्न केले. मोनिकाने पतीला घटस्फोट द्यावा असे मला वाटत होते. पण तिने माझे ऐकले नाही. त्यानंतर मी रवीला ठार मारण्याचा निर्णय घेतला. कारण मोनिका केवळ माझी आहे.
पुढील स्लाईडवर वाचा.... अनिश म्हणाला प्रेयसीही निघून गेली... पत्नीही घर सोडून गेली... हताश झालो होतो मी....