आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकसाठी देवेगौडा यांनी सुरू केले उपोषण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कावेरी - कावेरी पाणी वाटप प्रश्नी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा मैदानात उतरले आहेत. शनिवारपासून त्यांनी उपोषणाला सुरूवात केलीे. कर्नाटकला केंद्र सरकारकडून न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) ८३ वर्षीय नेते देवेगौडा यांनी विधानसभेसमोरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आपल्या आंदोलनाला सुरूवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी कर्नाटकला फटकारल्याच्या पार्श्वभूमीवर देवेगौडा यांनी अचानक या मुद्द्यावर उडी घेतली. माणसाला जिवंत राहण्यासाठी पिण्याच्या पाण्याची गरज असते. त्यामुळे आपण हे उपोषण सुरू केले आहे. केंद्र सरकारकडून आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान हा प्रश्न सोडवतील, असा ‘आत्मविश्वास’ त्यांनी व्यक्त केला. सिद्धरामय्या यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते.

त्याला मात्र देवेगौडा यांनी हजेरी लावली नाही. सर्वोच्च न्यायालयाने ६ तारखेपर्यंत सहा हजार क्युसेक पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पाणी वाटप प्रश्नावर कर्नाटकची पीछेहाट झाल्याचे मानले जात होते. त्यावर विचारविनिमयासाठी सिद्धरामय्या यांनी बैठकीचे आयोजन केले होते. कावेरीप्रश्नी न्यायालयाच्या निकालास बगल देऊन विधानसभेत नवीन विधेयके मंजूर केली.
सर्व पक्षीय बैठकीत पाणी देण्यास नकार
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. त्यात कावेरी मंडळ स्थापन करण्यासही सर्व पक्षातील नेत्यांनी विरोध दर्शवला.

मंडळ स्थापनेची तयारी विरोधात
सर्वोच्च न्यायालयात अॅटर्नी जनरलनी कावेरी जल व्यवस्थापन मंडळाची स्थापना करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यावरून ते (केंद्र सरकार) आमच्या विरोधात आहे असे दिसते, असे परमेश्वरा यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...