आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 रुपयांच्या नव्या नोटेवर छापलेला आहे हा रथ, श्रीरामांशी आहे याचे कनेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
50 रुपयांच्या नव्या नोटेवर पाषाण रथाचा फोटो. - Divya Marathi
50 रुपयांच्या नव्या नोटेवर पाषाण रथाचा फोटो.
बंगळुरू - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने 50 रुपयांच्या नव्या नोटेचे नोटिफिकेशन जारी केले आहे. नोटेच्या मागच्या बाजूला 'हम्पी'च्या पाषाण रथाचे छायाचित्र आहे. याला युनेस्कोने जागतिक वारशांच्या यादीत सामील केलेले आहे. असे म्हणतात, जेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मणासह माता सीतेच्या शोधात निघाले होते, तेव्हा श्रीराम हे वाली आणि सुग्रीव यांना भेटायला येथेच आले होते. नंतर श्रीरामांनी त्यांच्यासह मिळून वानरसेना बनवली होती.
 
इतिहास आणि संस्कृती रामायण काळाशी निगडित
- वास्तविक, दक्षिण भारताच्या कर्नाटक राज्यात हम्पी नावाचे एक जुने गाव आहे. येथे विजयनगर साम्राज्याची अनेक मंदिरे आहेत.
- येथील आर्किटेक्चर आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे हम्पीला वर्ल्ड हेरिटेज साइट मानण्यात आले आहे. येथील इतिहास आणि संस्कृती रामायण काळाशी निगडित आहे. 
- यात काही प्रसिद्ध मंदिरे आहेत विरुपाक्ष, लक्ष्मी, नृसिंह, शिवलिंग आणि हो विठ्ठल मंदिरही.
- पाषाणाचा बनलेला हा रथ वास्तुकलेचा अद्भुत नमुना आहे. दगडांना कोरून याचे मंदिर बनवण्यात आले आहे, जे रथाच्या आकारात आहे.
- येथे गरुडाची एक मोठी मूर्ती आणि दगडांनी बनलेला सर्वांगसुंदर रथ आहे, जे उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना ठरले आहेत. हे सकाळी 8.30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुले असते.
- या मंदिरांत भगवान विष्णूच्या विठ्ठल अवताराची पूजा होते. 15व्या शतकात या मंदिराची निर्मिती झाली असून काही राजांनी आपल्या शासनकाळात याच्या सौंदर्यात वेळोवेळी भर घातली आहे.
 
सारेगामा खांब
- या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे संगीतमय खांब आहेत. येथे ग्रेनाइटचे 56 खांब आहेत, ज्यांना सारेगामा पिलर्सही म्हटले जाते.
- विठ्ठल मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे या खांबांची भिंत आणि पाषाणाचा बनलेला रथ. यांना हळूच वाजवल्यास यातून संगीत धून ऐकू येते.
- असे म्हटले जाते की, याची चाके फिरत होती, पण यांचे जतन करण्यासाठी नंतर सिमेंटचा लेप लावण्यात आला आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, नव्या 50च्या नोटेशी निगडित विशेष माहिती... 
बातम्या आणखी आहेत...