बोकारो (झारखंड) - या 10 वर्षांच्या चिमुकल्याचे हात त्याचे जीवनातले मोठे दु:ख ठरले आहेत. बोकारोचे रहिवासी मोहम्मद शमीम यांचा मुलगा मोहम्मद कलीमचा हात विचित्र आजारामुळे गरजेपेक्षा जास्त विकसित झाला आहे. मो. शमीम मजुरी करतात. ते म्हणाले, माझ्या मुलाला हा आजार जन्मत:च जडला. अनेक डॉक्टरांना दाखवले, पण काहीच फायदा झाला नाही.
लहान मुले भिऊन पळून जातात
- या आजारामुळे त्याच्या हाताचे पंजे खूप मोठे झाले आहेत. त्याचे हे भलेमोठे हात पाहूनच मुले पळून जातात. मोठ्या हातामुळे कलीम आपले कोणतेही काम व्यवस्थित करू शकत नाही.
- कलीमची आई हलिमा बेगम म्हणाली, जन्मापासून कलीमचा हात सुजलेला आहे. वय वाढण्याबरोबर त्याचा आकारही वाढत गेला.
ऑपरेशनही झाले...
- डॉ. रतन केजरीवाल म्हणाले, या मुलाला जनुकीय आजार आहे. त्याचे दोन्ही हात शरीराच्या मानाने खूप जास्त विकसित झाले आहेत.
- उर्दू शाळेत शिकणाऱ्या कलीमचे शिक्षक सबीर अहमद यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच एका मुंबई स्थित संस्थेने या मुलाला आपल्या सोबत नेले होते.
- तिथे कलीमच्या चार बोटे आणि मनगटाचे ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशन नंतर त्या बोटांची वाढ थांबली आहे. पण दुसऱ्या हाताची सर्व बोटे, मनगटासहित वाढतच जात आहेत.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, आणखी फोटोज... फोटो क्रेडिट : शंभू नाथ