आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hansraj Hans Refuse Conversion In Islam In Pakistan

हंसराज हंस म्हणाले, मानवता हाच माझा धर्म, इस्लाम धर्म स्वीकारलेला नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर- मी सूफी गायक आहे. सूफीसाठी मानवतावाद हीच जात असते. मानवतावादाला धर्म-जात नसते. म्हणूनच माझा धर्म मानवतावाद आहे. मी कोणत्याही जाती-धर्मावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे कोणताही धर्म स्वीकारण्याचा व नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. मी पाकिस्तानात जावून इस्लाम धर्म स्वीकारलेला नाही, असे खणखणीत उत्तर पाकिस्तानातून नुकतेच परतलेले सूफी गायक हंसराज हंस यांनी दिले आहे.
हंसराज यांनी म्हटले आहे, की मी सर्व धर्मांचा आदर करतो. मी संपूर्ण जगभर फिरून मानवतावाद, शांती व सलोख्याचा संदेश देत फिरत असतो. पाकिस्तानमध्ये मी 15 फेब्रुवारीला गेलो होतो व 19 ला परत आलो. लाहोरमधील एका महिला फाऊंडेशनने मला चॅरिटी शोसाठी बोलवले होते. हंस यांनी हेही सांगितले, की पाकिस्तानमध्ये शीख खासदार रमेशसिंग अरोडा यांच्या निमंत्रणावरूनच मी तेथे गेलो होतो. मला माहित नाही वेबसाईटवर अशा बातम्या कशा पसरल्या. मात्र असे काहीही नाही. मी असे काही केले आहे का हे विचारण्यासाठी मी पाकिस्तानात असतानाच मला भारतातून फोन येऊ लागले होते. पण मी जन्मायला आलो तेव्हापासून सुफी आहे आणि सूफीचा मानवता हाच धर्म असतो, अशा शब्दात हंसराज यांनी खंडन केले.