आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमान चालिसा सव्वा कोटी पारायणाची जोरदार तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - देशात व परदेशात हनुमानचालिसाच्या महापारायणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रामनवमीनिमित्त 19 एप्रिल रोजी सायंकाळी 7 ते 8.00 वाजेपर्यंत सव्वा कोटी हनुमान भक्त एकाचवेळी पारायण करतील.

जीवन प्रबंधन गुरू पं. विजयशंकर मेहता श्री हनुमानचालिसा आणि राष्ट्रीयत्वाचा बोध या विषयावर 50 मिनिटे व्याख्यान देणार आहेत. ते हनुमान भक्तिसोबत देशभक्तीची भावना जागृत करतील. महापारायणाचे मुख्य आयोजन रायपूर येथे होणार आहे. याचे थेट प्रक्षेपण आस्था, संस्कार व आयबीसी 24 आदी वाहिनींवर होणार आहे. कार्यक्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश गोयल, केंद्रीय आयोजक विजय अग्रवाल तसेच समन्वयक शिवनारायण मुंदडा यांनी सांगितले की, विविध शहरांमध्ये कार्यक्रमाचे आयोजक आहेत. ते मंदिर, मैदान, उद्यान, सभागृह, धर्मशाळा आदी विविध ठिकाणी सामूहिक पारायण करतील. अमेरिका, आफ्रिका, इंग्लंड, हॉलंड व पाकिस्तानमध्येही पारायणाची तयारी सुरू आहे. पारायणामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिक, संस्थांनी मोबाइल क्रमांक 9425202721 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.