आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: 21 वर्षाच्या डिंपलवर आले होते अखिलेशचे मन, पाहा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अखिलेश यादव पत्नी डिंपलसोबत)
आज अखिलेश यादव यांचा वाढदिवस. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव हे राज्याचे सर्वात तरूण मुख्यमंत्री आहेत. अखिलेश यांचा जन्म 1 जुलै 1973 ला झाला. मुख्यमंत्री झाल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतील अखिलेश म्हणाले की, माझ्या लग्नानंतर माझे नशिबच बदलून गेले.
राजकीय घरण्यात जन्मलेल्या अखिलेशने या क्षेत्रात येण्यासाठी कोणतीही गडबड केली नाही. त्यांनी 2009 वा उत्तरप्रदेशच्या कन्नोज येथील विजय मिळवून राजकारणात आपले पाऊल ठेवले आणि 2012 ला राज्याचे सर्वात युवा मु्ख्यमंत्री बनले.
जन्म आणि शिक्षण
अखिलेश यांचा जन्म इटावा येथील सैफई गावात झाला. अखिलेश युपीचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव आणि मालती देवी यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजस्थानच्या सैनिकी शाळेत झाले. त्यानतंर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर अखिलेश म्हैसूर विद्यापिठात एन्वायरमेंट इंजिनिअरिंगची मास्टर्स डिग्री घेण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलिया येथील युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी येथूनही याच विषयातून मास्टर्सची पदवी घेतली.
रब ने बना दी जोडी -
अखिलेख यादव आणि त्यांची पत्नी डिंपल यांचा स्वभाव, आवडीनिवडी आणि कौटुंबिक पार्श्वभूमीपेक्षा खुप वेगळा आहे. या दोघांमध्ये काहीच मेळ बसत नाही. मात्र त्यांची जोडी वरूनच ठरवून दिली होती. 25 वर्षांचे अखिलेश कॉलेजच्या दिवसात 21 वर्षीय डिंपलसोबत भेट झाली. डिंपल लखनऊ विद्यापीठात कॉमर्सचे शिक्षण घेत होती तर अखिलेश ऑस्ट्रेलियामध्ये इन्वायरमेंट इंजिनिअरिंगची पदवी घेऊन परतले होते. एका कॉमन फ्रेंडमुळे या दोघांची ओळख झाली.
आवडीनिवडी होत्या वेगवेगळ्या -
अखिलेश आणि डिंपल यांचा स्वभाव अत्यंत वेगळा होता. डिंपल शांत स्वभावाची होती. तीला अभ्यास आणि घोडस्वारीची आवड होती. डिंपलला नेहमी नवनविन शिकण्याची, जाणून घेण्याची उत्सूकता असायची, तर अखिलेश यांना फुटबॉल आवडायचे. डिंपलला चित्रकला आवडायची तर अलिखेल यांना अमेरिकन रॉक बॅन्ड Metallica चे वेड होते.
अनेक संकटांनंतर झाले लग्न -
उत्तराखंडची रहिवाशी डिंपलचे वडील आर्मीमध्ये होते. तीन बहीणींमध्ये डिंमल दुसर्‍यानंबरची होती. तर त्यांचे वडील आर्मीमध्ये कर्नल होते. राजकारणाचा आणि यांच्या घराचा लांब लांबपर्यंत संबंध नव्हता. तर दुसरीकडे अखिलेश यांचे वडिल मुख्यमंत्री होते.
अखिलेश डिंपलच्या लग्नाला दोन्ही कुटुंबाचा विरोध होता. डिंपलचे कुटुंबीयांना केवळ मुलीची खुशी हवी होती, मात्र मुलायम सिंगला मुलाची पसंद आवडत नव्हती. असे ऐकण्यात येते की, वडिलांना पटवण्यासाठी अखिलेशला खुपच प्रयत्न करावे लागले आणि शेवटी त्यांच्या पयत्नांना यश आले. 24 नोव्हेंबर 1999 ला अखिलेश आणइ डिंपलचे लग्न झाले. या लग्नास अमिताभ बच्चन आणि राजेश खन्नासारख्या सुपरस्टार्सनी हजेरी लावली होती.
पुढील स्लाईडमध्ये पहा... अलिखेश आणि त्यांची पत्नी आणि मुलांसोबतचे काही फोटो...