1980 च्या काळामध्ये बॉलीवुड अभिनेत्री नीना गुप्ताच्या अफेअरची चर्चा माध्यमातून झाली. कॅरेबीयन क्रिकेट टीमच्या रिचर्ड्स सोबत नीना गुप्ता यांची एका कार्यक्रमात भेट झाली.
या दोघांना पहिल्या भेटीमध्येच प्रेम झाले. व्हीवीयन रिचर्ड्स नीनाच्या प्रेमांत इतके बुडाले होते की, आपले लग्न झालेल आहे, याचा विसर त्यांना पडला होता. या प्रेम प्रकरणानंतर नीनाला एक मुलगी झाली. ही मुलगी म्हणजे रिचर्ड्स यांच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखली जाते. नीना आणि रिचर्ड्स यांची मुलगी मसाबा आज मॉडलिंग जगातील एक प्रसिध्द व्यक्तीमत्व आहे. 2008 मध्ये नीना यांनी विवेक मेहरा सोबत लग्न केले. व्हीवीयन हे आपला 61 वा वाढदिवस साजरा करत आहेत त्यानिमित्तानी आज आम्ही त्यांच्या विषयीची रंजक माहिती देत आहोत.
कोण आहेत व्हीवीयन रिचर्ड्स -
व्हीवीयन रिचर्ड्स हे वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटर आहेत. रिचर्ड्स यांना किंग व्हिव नावाने ओळखले जाते. अंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये चांगली कामगिरी करणारा क्रिकेटर म्हणून रिचर्ड्स यांची ओळख आहे. 2002 मध्ये व्हिस्डनने रिचर्ड्स यांना जगातील तिसरा महान फलंदाज म्हणून सन्मानीत केले होते. या वेळी पहिल्या आणि दूस-या स्थानावर डॉन ब्रॅडमॅन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर होते.
नीना गुप्ता-
भारतीय चित्रपटातील कलाकार म्हणून नीना गुप्ता यांची ओळख आहे. यें नजदीकिया( 1982), मंडी(1983), उत्सव( 1984) , डॅडी( 1993), तेरे संग (2009) आणि' दिल से दिया वचन (2010-2011) या चित्रपटासह काही सीरियल्समध्ये नीना गुप्ता यांनी काम केले आहे.
पुढील स्लाईडवर वाचा भारतीय CELEBS च्या प्रेम कथा.