आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणा : बल्लभगड पाठोपाठ आता पलवलमध्‍येही धार्मिक तनाव; दगडफेकीत अनेक जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र
पलवल (हरियाणा) -बल्लभगडजवळ असलेल्‍या अटाली (जि. फरीदाबाद) गावामधील धार्मिेक तणाव अजून निवळला नाही. दरम्‍यान, पलवलमध्‍येही दोन भिन्‍न समाजात तेढ निर्माण होऊन दोन्‍हीकडून प्रचंड दगडफेक झाली. यात पोलिसांस‍ह अनेक नागरिक जखमी झालेत.
पोलिसांच्‍या माहितीनुसार, रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी टिकरी ब्राह्मण गावात दोन समाजात वाद झाला. त्‍यांच्‍यात दुपारी दगडफेक झाली. नंतर सायंकाळी 6 वाजतासुद्धा तुफान दगडफेक झाली. यात पोलिसांसह काही नागरिक जखमी झाले असून, त्‍यांची नेमकी संख्‍या कळाली नाही. सर्व जखमींवर उपचार सुरू असल्‍याचेही पोलिसांनी सांगितले.
का झाला हिंसाचार
या गावामध्‍ये दंगल का भडकली याचे नेमके कारण माहिती नसल्‍याचे पोलिसांनी सांगितले. दरम्‍यान, सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अटाली गावात मे महिन्‍यामध्‍ये मस्जिद बांधकामावरून धार्मिक वाद झाला होता. त्‍यावेळी 150 मुस्‍लीम कुटुंबांनी पोलिस ठाण्‍यात आश्रय घेतला. या प्रकरणी 70 व्‍यक्‍तींविरोधात गुन्‍हा दाखल झाला. पण, रविवारी पोलिसांनी केवळ 10 व्‍यक्‍तींनाच अटक केली. उर्वरित आरोपींना सोडून दिले. त्‍यामुळे पुन्‍हा वाद उफळला. कीर्तन सुरू असताना कीर्तनकार महिलेवर दगडफेक करून दंगलीला सुरुवात केली गेली असल्‍याचा आरोपही एका गटाने केला.