आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवहनमंत्री प्रजापतींवर अत्याचाराचा आरोप, ब्लॅकमेलिंग करून सतत शोषण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशचे परिवहनमंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांच्यावर एका महिलेने अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. कोल्ड्रिंकमधून नशेचा पदार्थ मिसळून अत्याचार झाल्याचे महिलेचे म्हणणे आहे. प्रसाद यांनी प्रसार माध्यमांच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.

महिलेच्या मते अडीच वर्षांपूर्वी माझी गायत्री प्रसाद यांच्याशी आेळख झाली होती. चित्रकूटमध्ये आम्ही भेटलो होतो. प्रसाद यांनी मला खाणपट्टा देण्याचे आश्वासन देऊन लखनऊला भेटीस बोलावले. ते मला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. तेथे कोल्ड्रिंकमध्ये नशेचा पदार्थ टाकून मला पाजण्यात आले. बेशुद्ध झाल्यानंतर माझे अश्लील फोटो काढले. त्यानंतर मला ब्लॅकमेल करून अत्याचार सुरूच ठेवला.

एवढेच नव्हे तर मंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्या १७ वर्षांच्या मुलीची छेडछाड करण्याचाही प्रयत्न केला. त्या घटनेनंतर मी १० ऑक्टोबर रोजी डीजीपी यांच्याकडे तक्रार केली. परंतु डीजीपी यांनी मोठे मंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर एफआयआर दाखल करू, असे सांगितल्याचे सदर महिलेचे म्हणणे आहे. अगोदरच सपामध्ये काहीही आलबेल नाही.

भ्रष्टाचारावरून बरखास्तीची कारवाई
गायत्री प्रसाद यांच्याकडे खाणमंत्रिपद होते. एक महिन्यापूर्वी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांना पदावरून बरखास्त केले होते. दुसऱ्यांदा त्यांच्याकडे परिवहन मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...