आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harassment During Delivery In Private ICU Hospital

खासगी आयसीयूमध्ये प्रसूतीदरम्यान छेडछाड, डॉक्टरांच्या वेशातील आरोपी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहादूरगड - हरियाणामध्ये झज्जर जिल्हातील बहादूरगडमध्ये एका खासगी नर्सिंग होममध्ये आयसीयूमध्ये प्रसूतीदरम्यान छेडछाडीचा प्रकार समोर आला आहे. २२ वर्षीय पीडित महिलेने नुकताच एका मुलाला जन्म दिला. पीडित महिलेच्या जबाबानुसार, आरोपीने डॉक्टर असल्याचे सांगितले आणि तपासण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, त्या व्यक्तीच्या संशयास्पद कृतीमुळे महिलेने आक्षेप घेतला. यानंतर आरोपी पळून गेला.

झज्जरचे पोलिस अधीक्षक सुमीत कुमार म्हणाले, शनिवारी रात्री उशिरा साधारण ३.३० वाजता ही घटना घडली. आरोपी कारमधून आला होता. तो रुग्णालयात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये व्हरंड्यात आणि पार्किंगच्या भागात फिरताना दिसला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. त्यांचे प्राधान्य आरोपीला अटक करणे हे आहे. सुरक्षेतील त्रुटीमुळे रुग्णालय कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल.

घटनेची पुनरावृत्ती
गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी काही वेळानंतर आरोपी जवळच्या एका खासगी रुग्णालयात दिसून आला होता. तिथेही त्याने एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला. आरडाओरडीनंतर तो पळून गेला.