आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्‍हिडियोमध्‍ये 30 लाख रुपये घेताना दिसले हार्दिक यांचे भाऊ, सरकारसोबत करार केल्‍याचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्दिक यांचा भाऊ पैसे घेताना दिसतो. - Divya Marathi
हार्दिक यांचा भाऊ पैसे घेताना दिसतो.
सूरत- पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांचे भाऊ रवी पटेल यांचा एक कथित व्‍हिडियो समोर आला आहे. या व्‍हिडियोनंतर पाटीदार समाजबांधवांमध्‍ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या व्‍हिडियोमध्‍ये रवी हे एका बिझनेसमनकडून 30 लाख रुपये घेताना दिसत आहेत. असा आरोप आहे की, आंदोलन मागे घेण्‍यासाठी त्‍यांनी सरकारकडून हे पैसे घेतले आहेत. व्‍हिडियोमध्‍ये काय दिसत आहे..
- हा व्‍हिडियो हार्दिक आणि सरकार यांच्‍यात सहमती करण्‍याचा प्रयत्‍न करणारे बिझनेसमन मुकेश पटेल यांनी जाहीर केला आहे.
- मुकेश पटेल यांचा दावा आहे की, गुजरात सरकारकडून सहमती करण्‍यासाठी हार्दिक पटेलने त्‍यांना ही रक्‍कम मागितली होती. पैसे घेण्‍यासाठी हार्दिक यांनी रवी यांना पाठवले होते.
- व्‍हिडियोमध्‍ये दिसत आहे की, रवी हे पैसे मोजल्‍यानंतर बंडल बॅगमध्‍ये टाकत आहेत.
- या व्‍हिडियोबाबत पाटीदार आरक्षण आंदोलन समितिने (पास) मौन धरले आहे.
- divyabhaskar.com च्‍या रिपोर्टर्सनी कित्‍येक कन्वीनर्संना या व्‍हिडियोबाबत मत विचारले, मात्र कोणीही काहीही बोलायला तयार नाही.
रवी व्‍हॉट्स अॅपवर मॅसेज पाठवत होता :- मुकेश
- मुकेश पटेल यांचे म्‍हणने आहे की, हार्दिकने पाटीदार समाजाचा अपमान केला आहे.
- तो पैशांचा लोभी निघाला, स्‍वार्थापोटी त्‍याने सर्व समाजाकडे पाठ फिरवली.
- मुकेश यांचा आरोप आहे की, हार्दिकच्‍या सांगण्‍यावरून रवि मला दररोज व्‍हाॅट्स अॅपवरून मॅसेज पाठवायचा.
- माझ्याकडे या सर्व बाबींचे पुरावे आहेत.
काय म्‍हणाले हार्दिक..
-
आपल्‍या भावाचा व्‍हिडियो समोर आल्‍यावर हार्दिक पटेल म्‍हणाले की, दिड महिन्‍यांपूर्वी मी तुरूंगातून बाहेर आलो आहे. कोर्टाच्‍या आदेशानुसार मी गुजरातच्‍या बाहेर म्‍हणजे राजस्‍थानात राहात आहे; त्‍यामुळे माझ्या मागे माझ्या कोण्‍या नातेवाईकाने कुणासोबत आर्थिक व्‍यवहार केला असेल त्‍याचा माझ्याशी काहीही संबंध नाही.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, बातमीशी संबंधित PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...