आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harish Ravat\'s Name Selected For Uttarakhand CM

उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदासाठी हरीश रावत यांचे नाव निश्चित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देहरादून- उत्तराखंडचे मुख्यमंत्रीपदी माळ अखेर केंद्रीय जलसंधारण मंत्री हरीश रावत यांच्या गळ्यात पडणार आहे. कॉंग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी मुख्यमंत्रीपदासाठी हरीश रावत यांच्या नावाची घोषणा केली. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार, हरीश रावत यांचे नावाची घोषणा केल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.

उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी हरीश रावत यांच्या नावाची औपचारिक घोषणा अजून झालेली नाही. मात्र, हरीश रावत यांच्या हजारो समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे भव्य स्वागत केले. फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
विजय बहुगुणा यांना शुक्रवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. उत्तराखंडमध्ये खांदेपालट होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. हरीश रावत यांचे नाव आघाडीवर होते. पक्षांच्या आमदारांची बैठकीत रावत यांना नावावर एकमत झाले. उत्तराखंडचे कॉंग्रेस प्रभारी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद आणि कॉंग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी, अंबिका सोन निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
मुख्यमंत्रीपदासाठी हरीश रावत यांच्या नावाची घोषणा होतात कॉंग्रेस भवनाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.