आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harish Rawat Says Areas Around Kedarnath To Be Developed For Winter Tourism

'केदारनाथ' पर्यटनासाठी विकसित करणार- मुख्यमंत्री हरीश रावत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केदारनाथ- आगामी हिवाळी पर्यटनाच्या दृष्टीने केदारनाथ परिसराचा विकास केला जाईल. एवढेच नव्हे तर ‘पर्यटनाचा स्वर्ग’म्हणून विकसित करण्याची योजना आहे, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी जाहीर केले आहे.

रावत यांच्या हस्ते गुरूवारी ११५ कोटी रुपयांचे प्रकल्पाचा कोनशिला समारंभ पार पडला. पुढील वर्षी जानेवारीत पर्यटन महोत्सव आयोजित करण्याची योजना आहे. हा परिसर हिवाळी पर्यटनाचा स्वर्ग कसा ठरेल, असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्व गोष्टींचा पुरवठा आणि प्रयत्न केले जातील. हेलिकॉप्टरच्या मदतीने येथील विकास कामांना गती देण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी भूसंपादन केले जात आहे. हेलिपॅड बनवण्यात आला आहे, अशी माहिती रावत यांनी दिली.

२०१३ मध्ये पुराची नैसर्गिक आपत्ती
केदारनाथमध्ये २०१३ मध्ये नैसर्गिक संकट आले होते. त्या पार्श्वभूमीवर पवित्र देवस्थानाच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने त्रिस्तरीय सुरक्षा योजना जाहीर केली आहे. नदीचा प्रवाह, केदारपुरीतील सुरक्षा भिंती उभ्या करणे इत्यादी मुद्द्यांचा त्यात समावेश आहे.

११३ गृह प्रकल्प
केदारनाथमध्ये सर्वात अगोदर ११३ घरांचा समावेश असलेल्या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. राज्यातील काही दानशूरांनी त्यासाठी जमिनी दान दिल्या.