आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

12वी पासने बी फार्मा सांगून M.Tech तरुणीसोबत केले लग्न, पत्नीची केली हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिभा अंकितचा लग्नातील फोटो - Divya Marathi
प्रतिभा अंकितचा लग्नातील फोटो
पानीपत - दहा महिन्यांपूर्वी लग्न करुन घरी आणेलल्या प्रतिभाला मंगळवारी रात्री हुंड्यासाठी मारुन टाकण्यात आले आणि मृतदेह फासावर लटकवून सासरच्यांनी आत्महत्येचा बनाव रचल्याचा आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह खाली उतवू दिला जाणार नसल्याची त्यांची मागणी होती.

शिक्षण विदेशात, दिल्लीत करतो जॉब
- मृत प्रतिभाचे वडील आणि भाऊ म्हणाले, लग्न ठरविताना अंकित बी फार्मा असल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते.
- असेही सांगितले होते की तो पुढील शिक्षणासाठी विदेशात गेला आहे.
- मुलाकडील मंडळींच्या बोलण्यात फसल्यामुळे एमटेक झालेल्या प्रतिभाचे लग्न अंकितसोबत लावून देण्यात आले.
- लग्न झाल्यानंतर कळाले की अंकित 12 वी पास आहे.
- तो दिल्लीत नोकरी करत असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र अद्याप आम्हाला माहित नाही की तो तिथे कोणती नोकरी करतो.

माफी मागून प्रतिभाला घरी आणले, त्याच रात्री केली हत्या
- प्रतिभाचे नातेवाईक त्रिलोक ठेकेदार यांनी सांगितले, की 24 वर्षीय प्रतिभा शर्माचे लग्न एक मे 2015 ला अंकित गौडसोबत लावून देण्यात आले.
- आमच्या कुवतीनूसार आम्ही जे देता येईल ते हुंड्यात दिले.
- मात्र, सासरी गेल्यानंतर भाजीत मीठ जास्त झाले तरी तिला मारझोड होऊ लागली. पती दारुच्या नशेत तिला मारहाण करत असायचा.
- तिच्या सासरच्या लोकांना गाडी पाहिजे होती, त्यासाठी तिला मारहाण सुरु होती.
- सात दिवसांपूर्वीच तिला मारहाण झाली होती, तेव्हा काका आणि भाऊ आले आणि ते प्रतिभाला माहेरी घेऊन गेले.
- मंगळवारी तिचे सासू-सासरे आणि सासरकडची इतर मंडळी इसरान येथे आले.
- त्यांनी माफी मागितली, यापुढे तिला त्रास होणार नाही असे आश्वासन दिले आणि ते तिला घेऊन गेले.
- त्याच रात्री तिचा खून केला आणि फासावर लटकवले.

नोकरी सोडायला लावली
- एमटेक पास प्रतिभा पानीपतमध्ये एका कॉलेजमध्ये नोकरी करत होती. मात्र तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करुन नोकरी सोडण्यास भाग पाडले. आरोप आहे, की तिचा पती कॉलेजमध्ये येऊन तिला त्रास देत होता. त्यामुळे तिने नोकरी सोडली.

माहेरच्या मंडळींनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास दिला नकार
- एक दिवसापूर्वीच सासरी पाठवलेल्या प्रतिभाच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर तिच्या माहेरच्या लोकांनी तिच्या घरी धाव घेतली.
- आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत फासावर लटकवलेला मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. पोलिसांनाही जुमानन्यास कोणी तयार नव्हते.
- पोलिसांनी मृतदेह खाली उतरवल्यानंतर माहेरची मंडळी अॅम्ब्यूलन्सच्या दरवाजासमोर उभे राहिले. त्यांनी दरवाजा उघडू दिला नाही.
- नाइलाजाने अॅम्ब्यूलन्स रिकामी परत गेली आणि पोलिसांच्या गाडीत मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला. तेव्हाही नातेवाईक पोलिसांच्या गाडीसमोर अडवे झाले होते.
- प्रतिभाचे शोकमग्न अपंग वडील व्हीलचेअरवर बसून परत-परत न्यायाची मागणी करत होते.
- त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले तेव्हाही प्रतिभाच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.
- पोस्टमॉर्टमनंतर प्रतिभाचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मृत प्रतिभा आणि संतप्त नातेवाईकांचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...