आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिजाची चार कोटींची संपत्ती तीन बहिणींमध्ये वाटली जाणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली - हरियाणातील माजी अधिकारी दिवंगत अनुराधा बाली ऊर्फ फिजाची जवळपास चार कोटी रुपयांची संपत्ती तिच्या तीन बहिणींमध्ये वाटप केली जाणार आहे. फिजाच्या संपत्तीमध्ये तिचा बंगला, तेथून मिळालेली रोख रक्कम, दागिने, गाड्या, ठेवींचा समावेश आहे. फिजाच्या गूढ मृत्यू प्रकरणात एसआयटीने नुकताच क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. या प्रकरणी दोन वर्षांपासून एसआयटी तपास सुरू होता. हरियाणातील चौधरी देवीलालपुत्र चंद्रमोहन यांच्याशी अनुराधा बालीने धर्मांतर करून विवाह केला होता. या जोडीने चांदमोहंमद - फिजा हे नाव धारण केले होते. प्रेमविवाह आणि नंतर घटस्फोट यामुळे हे प्रकरण गाजले होते.

ही संपत्ती ताब्यात
सेक्टर 48 सी : सव्वा कोटींचा आलिशान बंगला. 90 लाखांची रोकड, सध्या सरकारचा ताबा.
1 कोटीचे दागिने व बँक खात्यावरल 65 लाखांची रोकड
गाड्या : जवळपास 40 लाखांच्या महागड्या गाड्या