आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीने आधी आईला अन् आता हर्षिताला मारले: सिंगर मर्डर केसमध्ये बहिणीचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत - हरियाणाची लोककलाकार सिंगर आणि डान्सर हर्षिता दाहिया (20) च्या मर्डर केसमध्ये नवा दावा केला जात आहे. बुधवारी तिची बहीण लताने तिच्या पतीवर हर्षिताच्या खुनाचा आरोप केला आहे. लताच्या म्हणण्यानुसार, तिच्या आईच्या खूनप्रकरणीही तिचा पती आरोपी आहे. या केसमध्ये हर्षिता साक्षीदार होती. सध्या पोलिसांनी चौकशी आणि जबाब नोंदवण्यासाठी लताला सोबत नेले आहे. हर्षिता आणि लताच्या आईवडिलांचा मृत्यू झालेला आहे. तथापि, हल्लेखोरांनी 4 गोळ्या झाडून मंगळवारी हर्षिताचा खून केला होता. घटनेच्या वेळी तिचे काही मित्रही कारमध्ये तिच्यासेाबत होते.
 
हर्षिताने FB वर व्हिडिओ पोस्ट करून धमकी मिळाल्याचे म्हटले होते....
- हर्षिता दहिया सोनिपतच्या मोहम्मदपूर गावातील रहिवासी होती. सध्या ती तिच्या मावशीसोबत दिल्लीत राहत होती. हर्षिताच्या आईवडिलांचे निधन पूर्वीच झालेले आहे. हर्षिता दोन बहिणी आहेत, त्यांची लग्ने झालेली आहेत.
- मागच्या दीड वर्षात डान्स आणि गायिका म्हणून हर्षिता प्रसिद्ध झाली होती. फेसबुक पेजवर ती आपले व्हिडिओही अपलोड करायची. मृत्यूआधीही धमकी मिळाल्याचे तिने फेसबुकवर अपलोड केलेल्या व्हिडिओद्वारे म्हटले होते.
 
कसा झाला होता खून?
- मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता हर्षिता एका कार्यक्रमावरून परतत होती. तिचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. तिच्यासोबत संदीप आणि निशा हे मित्रही होते.
- सोनिपतच्या रस्त्यात एका कारने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केले आणि मग हर्षिताची गाडी अडवली. कारमधून दोन जण बाहेर आले. त्यांनी हर्षिताच्या मित्रांना पळून जायला सांगितले. यानंतर जवळून हर्षितावर 4 गोळ्या झाडल्या.
- प्रकरणाची माहिती मिळताच एसपी राहुल शर्मा, डीएसपी क्राइम देशराज आणि एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचली. सध्या, हत्येचे कारण समोर आलेले नाही. हर्षिताने फेसबुक व्हिडिओत म्हटले होते की, मी धमक्यांना भीक घालत नाही. परंतु तिचा खून करण्यात आला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...